Blog

राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतिदिन : हुतात्मा दिन !

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

——————————————————————————

आज 30 जानेवारी भारताचे राष्ट्रपिता, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील शिरोमणी, भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील प्रमुख नेतृत्व, ज्यांनी भारतालाच नव्हे तर जगाला सत्य, अहिंसा, एकता, सर्वधर्मसमभाव ही शिकवण दिली त्या महान महात्म्यांची आज पुण्यतिथी म्हणजेच हुतात्मा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो त्या पुण्य स्मृतिस कोटी- कोटी विनम्र अभिवादन! भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्ष लक्ष जवानांनी देशासाठी बलिदान दिले प्राणार्पण केले त्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस म्हणजेच हुतात्मा दिवस होय

30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि तोच दिवस संपूर्ण भारतात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो ज्यांनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली बालपणापासूनच गांधीजी देशप्रेम, राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम,असलेले व्यक्तिमत्व होते. पारतंत्र्य व गुलामी बद्दल तिरस्कार व मनामध्ये चीड़ निर्माण झाली इंग्रजांनी केलेला अन्याय अत्याचार बघून त्यांच्या मनावर सखोल असा परिणाम झाला बालपणापासूनच त्यांनी सत्याची कास धरली लहानपणी गांधीजीने श्रावण बाळ मात्र पित्र भक्त नाटक बघितले व या नाटकाचे पुस्तक वाचन केले बाळ श्रावणाचे मातृपितृभक्ती गांधीजींच्या हृदयापर्यंत पोहोचली त्यांना वाटे प्रत्येकाने अगदी श्रावणा सारखी भक्ती केली तर पूर्ण मानव जातच सुधारेल दुसरे नाटक त्यांनी हरिश्चंद्र तारामती हे पाहिले सत्य राजा हरिश्चंद्र, राजाचा संघर्ष , सत्यासाठी केलेला संघर्ष त्यांनी पाहिला आपल्या देशातील लोकांवर महिलावर होत असलेला अन्याय, अत्याचार, जाती ,धर्म काळा-गोरा असा भेदाभेद वर्णभेद, आपल्या देशातील दारिद्रता गरीबी,अज्ञान अंधकार अंधश्रद्धेच्या माध्यमातून होत असलेली लोकांची फसवणूक या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून महात्मा गांधीजींनी शिक्षणाला प्राधान्य दिले

ग्रामीण भागातील शिक्षण, महिला शिक्षण व्यवसायाभिमुख शिक्षण छोटे छोटे लघु उद्योग शिक्षण तसेच बारा बलुतेदारांचे शिक्षण शिक्षणाला प्रोत्साहन दिले जातिभेद वर्णभेद दूर करण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे तर आपणा सर्वांना माहिती आहे माझ्या देशातील गरीब लोकांना जोपर्यंत कपडे मिळणार नाहीत, अंगभर वस्त्र मिळणार नाहीत, तोपर्यंत मी स्वतः पूर्ण वस्त्र घालणार नाही असा पण त्यांनी केला व फक्त धोती आणि एक पंचा ते वापरू लागले गांधीजी श्रम देवतेची उपासना करत असत कुठलेही काम हे लहान नसते कमीपणाचे नसते सगळी कामे सारखीच असतात कामांमध्ये लहान-मोठा गरीब-श्रीमंत असा भेदाभेद नसतो म्हणून त्यांनी लहानात लहान कामे सुद्धा केलेली आहेत

आपल्या आश्रमातील विद्यार्थ्यांचे कपडे धूणे फाटलेली कपडे शिवुन देणे आश्रमाची स्वच्छता करणे गावा गावाची स्वच्छता करणे तसेच त्यांना स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्याचे महत्त्व, व्यायामाचे महत्त्व, समजावून दिले कामातच देव आहे देव दुसरीकडे शोधण्याची गरज नाही म्हणून त्यांनी स्वच्छतेचा मंत्र जगाला दिला। दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांवर होत असलेला अन्याय अत्याचार पिळवणूक थांबवण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला तसेच चंपारण्यातील मजुरावर होत असलेला अन्याय अत्याचार त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला जगाला सर्वप्रथम सत्य अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा मंत्र ,आंदोलन करता येते सामोपचाराच्या मार्गाने आपल्याला लोकांना समजावता येते लोकांच्या मनावर सत्याचा विश्वास असतो सत्य आणि अहिंसेने ने केलेले कार्य यशस्वी होते म्हणून त्यांनी स्वातंत्र्यासाठी वेगवेगळे आंदोलने हाती घेतले मिठाचा सत्याग्रह असेल चले जाव ची घोषणा असेल असहकार आंदोलन असेल

या विविध प्रकारच्या आंदोलनाच्या द्वारे त्यांनी जगाला एक प्रकारची अहिंसेची शिकवण दिली म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती सुद्धा जगभर जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते आज भविष्य काळातसुद्धा त्यांच्या विचारांची त्यांच्या कार्याची खरी गरज आहे असे महान विचार जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हुतात्मा दिनी पुनश्च एकदा विनम्र अभिवादन
जय हिंद।जय भारत।

Related posts