पंढरपूर

विठ्ठल कारखाना विकला तरी कर्ज फिटणार नाही.”अशा चेअरमन दादाला पराभूत करा. – सौ. शैलाताई गोडसे.

पंढरपूर –
विठ्ठल साखर कारखान्याची अवस्था आज बिकट झाली आहे. शैतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कै.औदुंबर आण्णा पाटील यांनी हा कारखाना उभा केला.शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वात जास्त दर देऊन महाराष्ट्रात गौरवलेला हा कारखाना आज कर्जबाजारी झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसबील थकीत ठेवले.ऊसबीलासाठी शेतकरी हेलपाटे घालून कंटाळले आहेत. त्यांना आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारखान्यातील कामगारांचा पगार दिला नाही. पगार मागितला म्हणून जेल मध्ये टाकणारे आज याच शेतकरी कामगारांकडे मताची भीक मागत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेनी सावध रहावे.अशा स्वार्थ पुढाऱ्यांना मताच्या पेटीतून सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे.

मंगळवेढ्यातील एक दादा आज भूमीपुत्र म्हणून मत मागत आहे. या दादाला अंदोलन करायचे माहीत आहे का? पस्तीस गावातील पाणीप्रश्नासाठी कधी अंदोलन केले का?लहानपणापासून पाणी येणार पाणी येणार म्हणून तुम्ही ऐकता याच पाणीप्रश्नासाठी तुम्ही अंदोलन केले का? भूमी पुत्र आहात तर या तालुक्यातील पाण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी का आवाज उठवला नाही. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे भूमीपुत्र दादा मंगळवेढ्याला का पाणी आणले.नाही. याचे उत्तर जनतेला द्या.पाण्यासाठी तहानलेल्या जनतेला तुम्ही पाणी दिले नाही.भूमीसाठी जो त्याग करतो,त्याभूमीला सजलाम सफलाम करतो.त्या भूमीतील लोकांचे कल्याण करतो. तो भूमीपुत्र असतो.भूमीपुत्र म्हणून लोक मतदान करीत नाही तर काम करणाऱ्या उमेदवाराला जनता मतदान करते.

नुसते गाजर दाखवणाऱ्या दादांना आता जनता भूलणार नाही. अपक्ष म्हणून मी सरपंच झाले,अपक्ष म्हणून मी जिल्हा परिषद सदस्य झाले.माझ्या कारकिर्दीत मी जनतेची असंख्य कामे केली.मंगळवेढा जनते साठी पस्तीस गावातील पाण्यासाठी मी शिरनांदगी तलावात उतरून उपोषण केले आहे. म्हैसाळ योजनेत आठ गावांचा समावेश. करून पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. वारसदार म्हणून नाही की भूमीपुत्र म्हणून नाही. एक सामान्य जनतेसाठी ,शैतकऱ्यांच्या कल्याणासाठी मला एकदा आमदार म्हणून संधी द्यावी. असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी मंगळवेढा तालुक्यातील खोमनळ,हाजापूर,सिद्धनगिरी,
जालिहाळ,निंबोळी, येथील ग्रामस्थांना केले.

Related posts