सोलापूर शहर

सोलापूर शहरांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचे भव्य स्मारक उभारा. संभाजी ब्रिगेडची मागणी.

सोलापूर( प्रतिनिधी)
जगातील अत्युच्च मातृत्व राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांचे सिध्देश्वर मंदिर तलावाच्या मध्यभागी असलेल्या आर्यलॅण्ड मध्ये अथवा विजापूर रोड येथील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या मध्यभागी आर्यलँड उभारून तिथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे महानगरपालिका आयुक्त यांना करण्यात आली आहे.

सोलापूर शहरांमध्ये अनेक विविध महापुरुषांचे पुतळे स्मारके आहेत पण सोलापूर शहरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा कोठेही ही पुतळा वा स्मारक नाही अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे!. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे.

आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेण्यासाठी सोलापूर शहरात जिजाऊ स्मारक होणे अत्यंत गरजेचे आहे.

Related posts