तुळजापूर

उपक्रमशील शिक्षक मा. श्री. विठ्ठल नरवडे (सर) यांना एकता फाऊंडेशनचा शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर .

साईनाथ गवळी
तुळजापूर तालुका प्रतिनिधी,
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणारे उपक्रमशील शिक्षक विठ्ठल नरवडे यांना एकता फाऊंडेशन उस्मानाबादचा शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजातील भावी पिढीवर उत्तम संस्कार करण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. आजपर्यंत अनेक सुजाण नागरिक समाजाला देण्याचे महान कार्य शिक्षकांच्या माध्यमातून झाले आहे. यामागे शिक्षकांचे योगदान प्रशंसनीय आहे .

श्री .विठ्ठल नरवडे यांनी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करणारे व नाविण्यपूर्ण उपक्रमाची जोड देऊन शिकणं सुलभ करणे ,अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अध्ययन अनुभव देणे, सतत नाविन्याचा शोध घेत राहणे, सामाजिक कार्यात योगदान देत समाजाशी नाळ जोडणे ,ज्वलंत सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात उपक्रम घेऊन त्याद्वारे समाजात संदेश देणे व त्याची जाणीव बालवयातच मुलांना देणे या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे .

ज्ञानाच्या धड्याबरोबरच विविध मूल्यांची रुजवण होण्यासाठी ते सतत मग्न असतात .पारंपरिकता व आधुनिकता यांचा समन्वय त्यांच्या कार्यात दिसून येतो .शिक्षण केवळ पुस्तकी न राहता बाहेरील जगाशी त्यांचा संबंध जोडणे ,वर्गाबाहेरील घडणाऱ्या घडामोडीचे ज्ञान त्यांना देऊन तसेच मिळवलेल्या ज्ञानाचा भविष्यातील जीवनात प्रत्यक्ष उपयोग करण्याचे उपयोजन कौशल्य त्यांच्यात उतरवण्यासाठी ,त्याचे दृढीकरण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात .

शिक्षण क्षेत्रात निरपेक्षवृत्ती व समर्पित भावनेने ,तळमळीने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान झाल्याने त्यांना प्रेरणा मिळते व आपल्या कार्याची दखल समाजातील इतर घटकांकडून घेतली जाते या बाबी त्यांचा उत्साह वाढवतात.त्यांच्या कार्याची दखल घेऊन उस्मानाबाद येथील एकता फाऊंडेशन त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल सचिव अभिलाष लोमटे ,अमित कदम, विशाल थोरात ,अतुल जगताप, प्रसाद देशमुख इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच या पुरस्काराबद्दल तामलवाडी पंचक्रोशीतील सर्व मित्र परिवार व पिंपळा ग्रामस्थ यांच्या कडून त्यांचे कौतुक होत आहे.

Related posts