तुळजापूर

तुळजापूर च्या पावन नगरीत मराठ्यांचा एल्गार

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.
आम्हांला कायदा हातात घ्यायला लावु देवू नका, मी मराठा समाज बांधवासाठी खांद्याला खांदा लावुन काम करणार आहे. आपल्या समाजातील लोक आपल्या विरोधात जाऊन मराठा समाजाला भडकावुन दोन गट पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, माझा राजवाडा माझा मराठा बांधव असल्याचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले श्री क्षेत्र तुळजापुरात आयोजित मराठा क्रांती ठोक मोर्चात बोलताना सांगितले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत, छञपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात शुक्रवार दि. ९ रोजी राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच, आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, एक मराठा लाख मराठा” असा जयघोष करीत हलग्याच्या निनादात येथील छञपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा मोर्चास प्रारंभ झाला.

प्रथम छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पुजन व राणी लक्ष्मी बाई उद्यानातील छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार छञपती संभाजीराजे भोसले व सकल मराठा समन्वय समितीच्या वतीने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन सकल मराठा क्रांती मोर्चा ची सुरुवात झाली. या मोर्चास मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातुन, संबध उस्मानाबाद जिल्हयासह तुळजापुर तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. मराठा क्रांती मोर्चाचे छञपती शिवाजी चौक मार्गे डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या ठिकाणी प्रथम संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न.प. च्यावतीने सँनिटायझर फवारणी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चात आलेल्या मराठा बांधवाना तुळजापुर नगरसेवक यांच्या वतीने पाणी, अल्पोहार नाष्टा देण्यात आला. यानंतर भवानी रोड मार्गावरुन “एक मराठा लाख मराठा असा जयघोष करीत श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसरात झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जाग करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने प्रथम पोवाडा सादरी करन करुन “जागरण गोधंळ घालण्यात आला. खासदार छञपती संभाजी महाराज यांच्या हस्ते जागरण गोधंळाची पुजा करवुन श्री देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी ” एक मराठा एक लाख मराठा” असा जयघोष करीत तेथील परिसर दणानुन सोडला.

यावेळी खासदार छञपती संभाजीराजे भोसले बोलताना म्हणाले की, छञपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं. तेव्हां अठरा पगड जातीचं, बारा बलुतेदाराच स्वराज्य निर्माण केल होत. त्यामुळे मराठा आरक्षण आमंच्या हक्काच आहे. राज्य सरकार व केद्रं सरकार कोणाचे असो? मला त्याच देण घेण नाही? आम्हांला फक्त मराठा आरक्षण पाहिजे. सन १९०२ मध्ये आरक्षण बहुजन समाजाला दिले. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण सुद्धा होते. जाती विषमता कमी करायची असेल तर परत मराठ्याना आरक्षण दिले पाहिजे. पुन्हा आरक्षण प्रस्थापित झाल पाहिजे. माझा मराठा समाज ८०% गरीब आहे. मराठा समाज हा मागासलेला समाज आहे. म्हणून हायकोर्टाने १३% आरक्षण दिले होते. पण एक गृहस्थ आपल्या विरोधात षढयंञ रुचुन दिल्ली जावुन विरोधात बोलतात. मराठा आरक्षणासाठी आण्णासाहेब पाटील यांनी बलीदान दिले. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी ४२ मराठा बांधवानी आपल्या प्राणाची आहुती दिली. मला त्यांचे बलीदान व्यर्थ जावू द्यायचे नाही. आम्हांला कोणाचे आरक्षण घ्यायचे आमंचे आरक्षण आम्हांला द्या. सकल मराठा बांधव एकत्र आला म्हणून या राज्य व केंद्र सरकारला आपली ताकद दाखवुन दिली आहे.

आम्हांला कायदा हातात घ्यायला लावु देवू नका, मी मराठा समाज बांधवासाठी खांद्याला खांदा लावुन काम करणार आहे. आपल्या समाजातील लोक आपल्या विरोधात जाऊन मराठा समाजाला भडकावुन दोन गट पाडण्याच्या प्रयत्नात आहेत या मराठा आंदोलनात जाळा पोळ मारा मारी व्हावी म्हणून कांही पुढारी टपुन बसले आहेत. या संसर्गजन्य कोरोना महामारी मध्ये आपण एकञ आला याचा मला अभिमान आहे. मराठा समाजाच्या प्रश्नासाठी वेळ पडली तर दिल्ली मुंबई येथे आम्ही मराठा बांधव आमंच्या हक्कासाठी येवु शकतो. मी खासदार राष्ट्रपती पुरस्कृत आहे. मी कुणा पक्षाचा नाही? पक्ष बिक्ष गेला खड्यात असा खुलासाही त्यांनी केला. माझा राजवाडा माझा मराठा बांधव आहे. मराठा आरक्षणासाठी पार्लमेंट व संसदेत प्रथम मी आवाज उठविला आहे. छञपती शिवाजी महाराज यांचा वंश असल्याने या घरात जन्म घेवुन माझा काय उपयोग, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवासाठी मी तुळजापुर मराठा क्रांती मोर्चासाठी आलो आहे. मराठा बांधवाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांनी समोर यावे, मराठा समाजाच्या मागण्या विचारात घेणे गरजे असल्याचे त्यांनी सांगितले.

या मराठा क्रांती ठोक मोर्चात खा. ओमराजे निबांळकर, आ. कैलास पाटील, जिवनराव गोरे, सुनील चव्हाण, मल्हार राणा पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, संतोष बोबडे, विनोद गंगणे, नागेश नाईक, नारायण नन्नवरे, महेंद्र धुरगुडे, ॲङ धिरज पाटील, अमर चोपदार, सज्जनराव सांळुके, जगन्नाथ गवळी, सुनील नागणे, धैर्यशील कापसे यांच्यासह तुळजापूर न. प. चे अनेक नगरसेवक आदीसह सकल मराठा क्रांती मोर्चाचे बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Related posts