Blog

“वसुंधरा दिन” – पृथ्वी सांभाळा ; पर्यावरण वाचवा—-

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर ,जिल्हा उस्मानाबाद।

========================================================================================================

मित्रांनो आज वसुंधरा दिन 22 एप्रिल हा सर्वत्र वसुंधरा दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो आपली पृथ्वी सुंदर स्वच्छ पाना-फुलांनी वेलीनी भरलेली ,झाडाझुडपांनी नटलेली आपली वसुंधरा! वसुंधरा म्हणजेच पृथ्वी ,पृथ्वीवरील सर्व सौंदर्य नद्या, पर्वत, सागर, पठार, वालुकामय प्रदेश, हिमालयातील सर्व पर्वत रांगा, बर्फाच्छादित प्रदेश, आपले पर्यावरण व पर्यावरणातील सर्व घटकांचा समावेश म्हणजे आपली पृथ्वी !पृथ्वी म्हणजे माता जननी सर्व जगाची माता प्रेमळ, मायाळू, शांत प्रामाणिक व क्षमाशील, मायेची ममता, मायेची ऊब ,आपल्याला देणारे तिच्या मध्ये एक मोठी शक्ती आहे ,ऊर्जा आहे

ती सतत आपल्याला देत राहते पृथ्वी म्हणजेच निसर्ग देवता होय ही निसर्गदेवता आपल्याला खूप काही देते आपल्या जन्मापासून ते मरेपर्यंत या सुंदर हिरव्या गर्द वनराईने नटलेल्या व प्रफुल्लित झालेल्या वसुंधरेवर आपण राहतो तिच्याच कुशीत जगतो खातो-पितो मोठे होतो पण ती वसुंधरा जशी आहे तशी! निसर्ग चक्राच्या नियमाचे पालन करीत वर्षानुवर्षे आपले कर्तव्य करीत आहे. पर्यावरणाचा थेट संबंध असल्यामुळे आपण ज्या पर्यावरणात वाढलो, मोठे झालो, खाल्लो पिलो त्या पर्यावरणातील संस्कार आपल्यावर घडतात पर्यावरणानेआपण घडलो निसर्गाचा एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे निसर्ग आपल्याला सतत सढळ हाताने देत असतो तेही मोफत पावसाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन लागते ,तर हिवाळ्यात कडाक्याची थंडी वाजते, तीनही ऋतु प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असतात या तीनही ऋतूत निसर्ग आपल्याला भरभरून देतो आणि आपण त्याचा सतत फायदा घेत राहतो पण आपण आपली जबाबदारी विसरत चाललो आहोत काही नैतिक जबाबदारी आपण स्वतः पाळली पाहिजे

आज आपल्या याच पृथ्वीची दुरावस्था होत चालली आहे मानव आपली हद्द पार करून आपली जबाबदारी कर्तव्य विसरून पृथ्वीवर आघात करीत आहे पृथ्वीवर अन्याय होताना दिसतो आहे लोकसंख्या विस्फोट हे एक खुप मोठे कारण व पर्यावरणाला घातक ठरणारी गोष्ट आहे वाढती लोकसंख्या मुळे या जगात खूप गर्दी वाढलेली आहे संख्या वाढल्यामुळे सर्व साधने कमी पडू लागली नैसर्गिक व भौतिक साधनांचा तुटवडा पडू लागला मानव आपल्या स्वार्थासाठी जंगल तोडू लागला अमाप वृक्षतोड केल्यामुळे वसुंधरेचे सौंदर्य नष्ट होऊ लागले वृक्षतोडीमुळे पाऊस कमी झाला पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली पाणी पाणी म्हणून लोक टाहो फोडू लागले पशुपक्षी प्राणी वाऱ्यावरती फिरू लागले याचाच एक भाग म्हणून जंगली प्राणी सुद्धा शहराकडे, गावाकडे वळलेले आहेत पाणी म्हणजे जीवन असे मूल्यवान पाणी कमी पडू लागले, झाडे वनस्पती कमी झाल्यामुळे सर्वत्र प्रदूषण वाढले मोठ मोठ्या शहरांमध्ये औद्योगिकरण वाढले आहे त्यामुळे हवाप्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले तसेच विविध नद्यांमधून कचरा ,पाण्याची बॉटल व इतर पदार्थ पाण्यात टाकण्यात येतात कारखान्यातील विषारी पाणी, रसायनमिश्रित पाणी ,नद्यात सोडल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे तेच पाणी सर्व पशु,पक्षी,प्राणी पितात व त्यांचा मृत्यु होतो.

अशाप्रकारे हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे ही मानवासाठी चिंतेची बाब आहे आज खरी गरज पर्यावरण वाचवण्याची आहे पर्यावरणाची सुरक्षा करण्याची गरज आहे “झाडे लावा झाडे जगवा “तसेच “एक मूल एक झाड” ही संकल्पना समाजात जागृत करण्याची आवश्यकता आहे भूमी ही आपली माता आहे जननी आहे आपला जन्म या मातीतच होतो हीच भूमी आपल्याला अन्नधान्य देते आपला शेतकरी याच भूमीतून विविध प्रकारचे अन्नधान्य पिकवतो आणि तेच अन्न म्हणून आपण आपल्या ताटात घेऊन ग्रहण करतो .हीच भूमी आहे आपल्याला विविध प्रकारची फळे देते गोड आंबट तुरट विविध रंगांची फुले व सुगंधाची फुले देते गोड गोड असा ऊस , द बोरे, चिंचा ,आवळे, सीताफळ, रामफळ, कीवी यासारखा रानमेवा आपल्याला देते काही फळे व फुले ही आरोग्याशी संबंधित आहेत औषधी स्वरूपात ते कार्य करतात तर आपल्याला आवश्यक असणारी औषधी वनस्पती देखील देते उदाहरणार्थ गुळवेल ,बेल, कडूनिंब, जखमजुडी ,तसेच संजीवनी सारखी औषधे देणारी हीच आपली वसुंधरा आहे याच पृथ्वीतलावर पशुपक्षी प्राणी आनंदाने आपले जीवन जगत असतात मानवाला आवश्यक जीवनावश्यक अन्न, वस्त्र, निवारा ,पाणी, हवा ,वातावरण शुद्ध ऑक्सिजन आपल्याला हीच वसुंधरा देते! तेव्हा या वसुंधरेचा सांभाळ करणे सुरक्षितता ठेवणे ही काळाची गरज आहे परंतु मानव आपल्या स्वार्थापोटी निसर्गाचे शोषण करीत आहे रक्षण करण्याचे सोडून निसर्गाचा फक्त भक्षक बनत चालला आहे

जंगले नष्ट, वने नष्ट, बाग-बगीचे नष्ट ,करून या भूमीला मरूभूमी किंवा वाळवंट बनवायचे काम सध्या तरी करीत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे याच भूमीवर भयंकर अशा अनु चाचण्या घेण्याचे सत्र चालू आहे त्यामुळे भूमि व ही वसुंधरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे विविध प्रकारचे रासायनिक केमिकल फवारणी होत आहे या सर्वांमुळे ही भूमी अकार्यक्षम होत चालली आहे यापासून तिला वाचवले पाहिजे खरंतर पृथ्वी ही खूप क्षमाशील आहे आपण कितीही त्रास दिला तर ती क्षमाशील आहे आपल्याला माफ करते आहे कारण ही पृथ्वी म्हणजे माता, माता म्हणजे जननी जगाची माता आहे दया-क्षमा-शांती हे तत्त्व तिच्यामध्ये सामावलेले आहे आपल्या जन्माच्या अगोदरच निसर्गाने आपल्याला आपल्या भोजनाची व्यवस्था करून ठेवलेली आहे! निसर्ग ही एक प्रकारची शक्ती निर्माण केलेली आहे व ही या शक्तीवर आपण आपले जीवन आनंदमय जगत आहोत आज वसुंधरा दिनानिमित्त आपण या वसुंधरेचे सौंदर्य टिकवणे गरजेचे आहे सर्वांनी या पर्यावरणाचा सांभाळ करणे आवश्यक आहे

पूर्वीच्या काळी मुसळधार पाऊस पडत असे आपण असे ऐकलेले आहे व अनुभवलेले ही आहे याचे कारण त्यावेळी भरपूर प्रमाणावर झाडी होती जिकडे पाहावे तिकडे वनराई होती रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडे होती पण आधुनिक काळात रस्ते बांधणीसाठी या झाडांची कत्तल, झाडे तोडण्यात आली व सगळीकडे उजाड उजाड असे दृश्य निर्माण झाले लाखो वृक्षांची वृक्षतोड केल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले हवेतील पर्यावरणातील गारवा हळू हळू हळू कमी झाला व आपले पर्यावरण दूषित झाले मानवासाठी सजीवांसाठी असुरक्षित बनत चालले आहे याचा विचार व अभ्यास सर्वांनी करायला हवा व त्यावर उपाय म्हणून पर्यावरणावर होत असलेला मानवी अन्याय थांबवावा प्राचीन काळापासून संत महंतानी निसर्ग व आपल्या वसुंधरेचे सुंदर वर्णन केलेले आहे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी—-

आधुनिक काळात मोठ्या प्रमानावरील औद्योगीकरण करत असताना विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग करित असताना वसुंधरेला त्रास,ईजा होणार नाही याची काळजी व जबाबदारी स्वीकारली पाहिजे विविध मोठमोठे प्रकल्प राबवत असताना वृक्षतोड़ नको आहे तर वृक्षारोपण करणे व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे प्रत्येकाने फक्त एक झाड़ लावावे व त्याला आपल्या मुलाप्रमाने सांभाळावे मोठे करावे कारण आज परिस्थिति खुप गम्भीर बनली आहे! कोरोनाच्या या महाभयंकर संकटाच्या काळात माणसांना ऑक्सिजन कमी पडत आहे आणि हे शुद्ध ऑक्सिजन तयार करण्याचे व आपल्याला मोफत देण्याचे कार्य निसर्ग, ही वसुंधरा करते म्हणून आपण आपली जबाबदारी पाळून वसुंधरेचे संरक्षण करणे खूप खूप महत्त्वाचे आहे वृक्षांचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व समजावण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करता येईल शाळा विद्यालय, महाविद्यालय, महाविद्यालयातील विविध उपक्रम, प्रभात फेरी काढून वृक्षदिंडी काढून, सुविचार घोषवाक्य, यांच्या आधारे जनजागृती रॅली काढून केली जाऊ शकते व आपल्या वसुंधरेचे रक्षण करता येते आपले कुटुंब आपली जबाबदारी तसेच आपले कुटुंब आपली वसुंधरा, आपली जबाबदारी पाळा घरीच रहा सुरक्षित रहा नियम पाळा कोरोना टाळा! हिच आज या वसुंधरा दिनी अपेक्षा धन्यवाद🙏🏻🙏🏻

Related posts