पंढरपूर

पाटलांच्या प्रयत्नांमुळे मिळणार तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसात पाणी

पंढरपूर प्रतिनिधी:- उजनी कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन वास्तविक १मार्च पासून आवश्यक होते. परंतू सल्लागार बैठक न झाल्याने वीस दिवस उशीरा म्हणजेच २०मार्च पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.मात्र सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व पिके पाण्याअभावी जळून जात असल्याने पिकांना तातडीने पाणी पुरविणे गरजेचे बनले आहे.
परंतू सध्या चालू असलेल्या कालव्याच्या पाण्याचा दाब कमी असल्याने टेल टू हेडच्या धोरणानुसार पंढरपूर तालुक्याला पाणी मिळण्यास अजून वीस ते पंचवीस दिवस लागतील अशी शक्यता निर्माण झाल्याने पंढरपूर तालुक्याच्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी पंढरपूर येथील श्री.अभिजीत पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगितली. तसेच या बाबतीत मदत व पाठपुरावा करण्याची शेतकऱ्यांनी अभिजीत पाटील यांना विनंती केल्यानंतर पाटलांनी तात्काळ सोलापूर येथील भीमा पाटबंधारे विभागाचे उपमुख्यअभियंता श्री क्षीरसागर यांना भेटून सदर शेतकऱ्यांची अडचण लक्षात आणून दिली.उप मुख्यअभियंता श्री क्षिरसागर यांना पाटील यांनी टेल टू हेड भिजवताना पंढरपूर तालुक्यातील तुंगत, रोपळे, करकंब,भोसे व इतर गावाना सिंचनाला पाणी अजून वीस ते पंचवीस दिवस लागू शकतात यांची माहिती दिली.तसेच या कालावधी दरम्यान पंढरपूर तालुक्यातील पिके द्राक्षे,डांळिब, कलिंगड, ऊस अशी पिके पंचवीस दिवस पाण्याविना जळून जातील. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते हे निदर्शनास आणून श्री. क्षीरसागर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अभिजीत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे उपमुख्य अभियंता क्षीरसागर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ७ तारखेपासून आपल्या पंढरपूर तालुक्यात पाणी वितरण करण्याचे आश्वासन दिले आहे.यामुळे शेतकऱ्यांनी अभिजीत पाटील यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

Related posts