दक्षिण सोलापूर

मंद्रूप महाविद्यालयाच्या डॉ. रामेश्वर मोरे यांची समाजशास्त्र अभ्यास मंडळावर निवड

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. रामेश्वर मोरे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉ. रामेश्वर मोरे यांचे शैक्षणिक कार्य चांगले असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संशोधन करून पीएच.डी. पदवी पूर्ण केली आहे त्याचबरोबर याच वर्षी त्यांची सोलापूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र मध्यवर्ती संशोधन समितीवरही सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉ. मोरे हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील असून त्यांनी दोन संदर्भ ग्रंथ व एक क्रमिक पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच २० पेक्षा जास्त संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

त्याचबरोबर स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथेही समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. एकंदरीत या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पी. एल. कोळी, उपाध्यक्ष डॉ. सी. जी. हविनाळे, अँड. संदेश कोळी ,माजी अध्यक्ष प्राचार्य नरेश बदनोरे, संस्था विश्वस्त यु.बी. डांगे ,सचिव एम.डी. कमळे, खजिनदार प्रा. व्हि.के.पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम.भांजे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी डॉ. रामेश्वर मोरे यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts