पंढरपूर

स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन साजरा

दैनिक राजस्व
सचिन झाडे-

पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेबांचे अनेक क्षेत्रांमधील कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या विद्वत्तेला माणुसकीची जोड असल्याने ते भारताच्या सर्वांगीण मानव विकासाचे प्रेरणा बीज ठरतात.’ असे सांगून त्यांच्या जीवनातल्या अनेक महत्वाच्या घटना सांगितल्या. प्रा. यशपाल खेडकर म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारी अशी असून ते राज्यशास्त्र व कायद्याचे अभ्यासक होते. ग्रामीण भागात जावून विश्वबंधुत्वाची तत्वे पटवून समाज बांधणीचे कार्य त्यांनी हिरीरीने केले. आयुष्यभर विद्यार्थी राहून समाजाला जागृत करण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी केले. कोणत्याही घटकात भेदभाव होऊ नये हा दृष्टीकोन समोर ठेवून त्यांनी घटना लिहली. ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ या त्यांच्या मंत्रावर प्रा. खेडकर यांनी प्रकाश टाकला. तसेच पंढरपूर मध्ये कराड नाक्याजवळ डॉ. आंबेडकर यांनी पंढरपुरातील जनतेला उत्तम मार्गदर्शनही केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एस.ए.लेंडवे, डॉ. विद्याराणी क्षीरसागर, डॉ. वैष्णव काळे, प्रा. भास्कर गायकवाड, प्रा. अमोल चौंडे, प्रा. धनराज डफळे, प्रा. शितल झाडबुके, प्रा. अनुजा लोटके, प्रा.प्रज्ञा होनमुटे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, अमोल चंदनशिवे, मुकुंद कांबळे, मामा नाईकनवरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts