तुळजापूर

राज्य शिक्षक पुरस्काराबद्दल डॉ . शिवाजी चव्हाण यांचा सत्कार.

स्नेहबंध ग्रुप व डी एड परिवारातर्फे आयोजन

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धन वाडी येथील शिक्षक डॉ . शिवाजीराव चव्हाण यांना जाहीर झाला आहे . त्याबद्दल स्नेहबंध मित्रपरिवार व डीएड वर्गमित्रांतर्फे त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला .याप्रसंगी श्री तानाजी म्हेत्रे , विनोद चुंगे ,विठ्ठल नरवडे , जोतिबा जाधव , सिद्धेश्वर आगाशे यांची विशेष उपस्थिती होती .

दैनंदिन अध्यापनाचे काम करत असताना श्री चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग केले आहेत .विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून अध्ययन सुलभ होण्यासाठीविविध तंत्राचा व साधनांचा हे वापर करतात .शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यात ही आपले योगदान दिले आहे . ते सध्या उस्मानाबाद तालुक्यात गोवर्धनवाडी जि .प .शाळेत कार्यरत आहेत .नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे .त्यांच्या आजपर्यंतच्या सेवा कार्याची दखल घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातून त्यांची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे .

देश आणि समाज यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे . श्री . चव्हाण यांनी हा पुरस्कार जिल्ह्यात ग्रामीण भागात तळमळीने ,निष्ठेने काम करणाऱ्या सर्व गुरुजींचा हा सन्मान आहे .तसाच आज पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना सेवेच्या माध्यमातून अध्यापन करण्याची संधी मिळाली त्यांचा आहे ,यात मार्गदर्शक अधिकारी , माझे सहकारी व मित्रपरिवार यांची प्रेरणा पुरस्कारापर्यंतच्या प्रवासात सोबत होती अशी भावना व्यक्त करताना या पुढील काळात ही विद्यार्थ्यांसाठी काम करताना सदैव मीही विद्यार्थी राहूनच कार्यरत राहीन अशी भूमिका त्यांनी मांडली .पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री . विठ्ठल नरवडे यांनी मानले.

=====================
राज्य शासनाकडून मिळणारा हा पुरस्कार प्रेरणा देणारा व अधिक जबाबदारी वाढवणारा आहे . शिवाय अशा पुरस्काराने इतरांनाही प्रेरणा मिळते . हा पुरस्कार एक वर्षासाठी जरी असला तरी प्रेरणा ही आयुष्यभरासाठीची आहे .नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचे शिकणे सुलभ व आनंददायी केले . निरपेक्ष भावनेने केलेल्या सेवेचे हे फळ असून अशा कौतुकाने सार्थक झाल्याचे वाटते .

डॉ . शिवाजीराव चव्हाण
(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक)

Related posts