अक्कलकोट

कोरोना काळातही वटवृक्ष देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच  – मंदीर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप

प्रतिनिधी (अक्कलकोट) –
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीनेे माहे ऑक्टोबर महिन्याचा वेतन व  बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) एकत्रितपणे वितरण करण्यात आले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळेे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील स्वामी भक्त अॅड. मधुकर वैद्य व सहकारी यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे मिठाई वाटपही अॅड. राजन पाटणकर, नुतन पाटणकर, मधुकर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मधुकर वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त आहोत. स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणारया सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस व आमच्या वतीने मिठाई वाटप करुन देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास व देवस्थान समितीस असल्याचे सांगीतले.

कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या ८ महिन्यांपासून मंदीर बंद असूनही वटवृक्ष मंदीर समितीच्या सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यांना मंदीर समितीच्या वतीने अनेक कर्मचारी सेवेकरी घरी असतानाही सर्वांना दरमहा अगदी वेळेवर पुर्ण वेतन मंदीर समितीच्या वतीने देण्यात आल्याचे ऐकून महेश इंगळे व मंदीर समिती विश्वस्तांचा आम्हा वैद्य कुंटूंबियांना सार्थ अभिमान वाटत आहे. आता दिवाळीतही सर्व कर्मचाऱ्यांना (स्वामी कृपा प्रसाद) दिवाळी बोनस देवून कर्मचाऱ्यांच्या घरी खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला असल्याचे मनोगत व्यक्त केले. सर्व सेवेकरी, कर्मचारी व विश्वस्त पदाधिकाऱ्यांना सुख, समृध्दी व आरोग्य लाभावे या करीता स्वामींच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी मधुकर वैद्य व कुटूंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद,  देवून यथोचित सन्मान करुन वैद्य कुटूंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापरून या स्वामी प्रसाद (बोनस) वेतन व मिठाईचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, मधुकर वैद्य व कुटूंबीय, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, इत्यादी उपस्थित होते.

Related posts