दक्षिण सोलापूर

सिंदखेड पुरग्रस्त शेतकरी कुटुंबांना सारथी युथ फाउंडेशन कडून दिवाळी फराळ

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी/दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आॅक्टोंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे सिना नदीला आलेल्या महापुरामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात पाणी शिरले. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी व कामगार कुटुंबांना याची झळ अधिक बसली. दिवाळी सण आला परंतु झालेल्या नुकसानीमुळे दिवाळी गोड कशी लागेल. अशा या पुरग्रस्त शेतकरी व कामगार कुटुंबांना फराळ पाकिटांचे वाटप सारथी युथ फौंडेशनच्या वतीने करण्यात आले.

सारथी युथ फौंडेशन मागील १३ वर्षापासून समाजातील गरजू कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा करत असते. याहीवर्षी अखंडपणे हा सण सारथीने गरजू कुटुंबासोबत साजरा केला. दिवाळी म्हटलं की फराळ आलाच.आजही समाजात अनेक कुटुंब आहेत जी अडचणींमुळे दिवाळी सण साजरा करू शकत नाहीत. अशा कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा करून सारथी सामाजिक बांधिलकी जपत आहे.
यावर्षी निर्माण झालेल्या कोरोनाजन्य परिस्थिमुळे सुरक्षेच्यादृष्टीने नियम पाळत, फराळ पाकिटे तयार करून वाटप करण्यात आले.
फराळ वाटप करण्यासाठी सारथी युथ फौंडेशनचे अॅड. जावेद नगारे,रामचंद्र वाघमारे, तुकाराम चाबुकस्वार,मंजुनाथ फुलारी,राजेश शेखर सानक सिंदखेड गावाचे माझी सरपंच रविंद्र इंगळे,सोसायटी चेअरमन बसवराज गवसने,राजशेखर भुसारे,फिरोज पटेल, काशीराया हविनाळे,अंकुश गावडे, सातप्पा माने …. आदिनी परिश्रम घेतले.

Related posts