उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) MPO बैठक आ. कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

महाअँग्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आयोजित उस्मानाबाद(धाराशिव) जिल्हातील “शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी” याबाबत रोमा पॅलेस हॉटेल, धाराशिव(उस्मानाबाद) येथे बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष श्री.हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. कैलासदादा पाटील अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादित मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कंपन्यांना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही याप्रसंगी उपस्थित असलेल्या शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधिनां दिली.

याप्रसंगी BVG ग्रुपचे अध्यक्ष मा. श्री. हनुमंतराव गायकवाड, कळंब-धाराशिवचे लोकप्रिय आ. कैलासदादा पाटील, एफ.पी.ओ. ऑर्गनायझेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संदीप तांबारे, बिव्हीजी ग्रुपचे रवी गाडे, संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष अशोक लांडगे, प्रताप देशमुख, तुषार वाघमारे, सयाजी शेळके, रवी शेळके तसेच जिल्हातील विविध शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related posts