दक्षिण सोलापूर

टाकळी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा ; ग्रामपंचायत व निर्भिड सामाजिक संघटनेचा अनोखा उपक्रम.

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन टाकळी ग्रामपंचायत व निर्भिड सामाजिक संघटनेच्या वतीने टाकळी – चिंचपुर रोडवरील नविन वस्तीचे ‘बोधिवृक्ष’ नगर असे नामकरण करण्यात आले. यावेळी या नगरातील प्रत्येक कुटुंबास बोधिवृक्ष भेट देऊन मंद्रुप पोलिस ठाण्याचे स. पो. नि. डाॅ. नितीन थेटे साहेब यांच्या हस्ते बोधिवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नविन टाकळी येथील मागासवर्गीय वस्तीचे नामकरण महात्मा जोतिराव फुले नगर असे करण्यात आले. यावेळी २ हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन व सिमेंट काँक्रिट रोडचे लोकार्पणही करण्यात आले.

तथागत गौतम बुद्ध व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी डाॅ. थेटे व ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. जमलेल्या नागरिकांना लाडु वाटप करुन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा समारोप करण्यात आले.


यावेळी उपसरपंच सिद्धाराम घोडके, ग्रा.पं.सदस्य सुभाष बगले,सागर कलशेट्टी,चंद्रशेखर गायगवळी,जयश्री घोडके, प्राजक्ता साबळे,शांतप्पा दुधभाते, रविकांत शिवशरण सर, बाळु लाड, दिलीप चांदकवठे, विद्यानंद लोणीकर, रेवप्पा साबळे भिमगर्जना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts