महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे. मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहे. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाचा वातावरण पाहायला मिळत आहे.

Related posts