पंढरपूर

पुणे पदवीधर निवडणूकीत दिपक चंदनशिवे मैदानात, केला निवडणूक अर्ज दाखल

पंढरपूर – :
आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार दिपक चंदनशिवे यांनी पुणे पदवीधर मतदार निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी आरपीआय चे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारशिंगे व शिक्षक, पदवीधर प्रदेश अध्यक्ष घनश्याम चिरणकर, सुनिल सर्वगोड, आबासाहेब दैठणकर अशोक सरवदे अजित गायकवाड सिध्दू पांडगळे अॅड महेश कसबे अॅड काकासो केंगार, रवी भोसले, श्रीनाथ बाबर, आश्विन गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.

पुणे पदवीधर मतदार संघाची जागा महायुती मधून मिळवण्यासाठी आरपीआय (आठवले) पक्ष आग्रही आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी दिपक चंदनशिवे यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. दिपक चंदनशिवे हे आरपीआय पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेश संघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत व पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नियोजनबध्द कार्यक्रम राबवून आपले तगडे आव्हान प्रतिस्पर्ध्या समोर उभे केले आहे.

रामदास आठवले हे भाजपा नेतृत्वाशी वाटाघाटी करून पुणे पदवीधर मतदार संघ मिळवतात का? हे पाहणे आता ओतुस्क्याचे ठरणार आहे. सत्तेत वाटा मिळावा यासाठी आरपीआय पक्ष आग्रही आहे.

दिपक चंदनशिवे यांनी ह्या निवडणुकीसाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. आक्रमक पदवीधर मतदार नोंदणी, त्या सोबतच मतदारांशी थेट संपर्क, पश्चिम महाराष्ट्रात जनतेची केलेली कामे याच्या बळावर दिपक चंदनशिवे यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवत आहेत.

रामदास आठवले यांचा वरदहस्त, संत, महंत, वारकरी संप्रदाय आणि आणि आंबेडकरी नेते, कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे दिपक चंदनशिवे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

महाराष्ट्रातल्या पाच विधानपरिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला निवडणूक होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Related posts