उस्मानाबाद 

धाराशिव येथे आर्चरी व रायफल शूटिंगच्या क्रिडा साहित्याचे लोकार्पण.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – येथे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून आर्चरी व रायफल शूटिंगच्या क्रीडा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद (धाराशिव) येथे जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून अर्चरी व रायफल शूटिंगच्या क्रिडा साहित्याचे लोकार्पण आर्चरी असोशिआशनचे अध्यक्ष तथा खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

ग्रामीण भागातील आपले खेळाडू क्षमता असून केवळ क्रीडा साहित्य न मिळाल्याने त्यांच्या क्षमतेला वाव मिळत नाही. पण आज आर्चरी स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी जवळपास १६ सेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार यश दैदीप्यमान असेल आणि जिल्हावासीयांना अभिमानास्पद राहील असा विश्वास आहे.

याप्रसंगी आर्चरी असोशिआशनचे अध्यक्ष तथा खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, जिल्हा परिषद सदस्य बालाजी बप्पा जाधवर, आर्चरी असोशिआशनचे सहसचिव अभय वाघोलीकर, आसोशिअशनचे मार्गदर्शक (कोच) अल्लाउद्दीन सय्यद, शहरप्रमुख संजय पप्पू मुंडे, पं.समिती सदस्य गजेंद्र जाधव, अभिजित देशमुख, युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके याशिवाय खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते.

Related posts