उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद.) येथे खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद.) – महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मिळालेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे वाटप धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव (उस्मानाबाद) येथे शिवसेना पक्ष कार्यालयास सुपूर्द केली.

सदरील रुग्णवाहिका शिवसेना संपर्क कार्यलय, धाराशिव (उस्मानाबाद) येथे उपलब्ध राहणार आहे. संपर्कासाठी शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी 9422464640 बालाजी सावंत +919689663740, समाधान शिंदे 9011650021 तसेच संपर्क कार्यालयासी संपर्क साधावा, अशी माहिती खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिली. सदरील रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज असून नक्कीच या रुग्णवाहिकेंचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी होईल. हि रुग्णवाहिका अतिप्रसंगात आलेल्या व्यक्तीची जीवन तारणारी माऊली म्हणून नावारूपास येईल.

याप्रसंगी खा. ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, भारत काका देशमुख, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, जि.प.सदस्य बालाजी बप्पा जाधवर, गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शहरप्रमुख संजय पप्पू मुंढे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, भिमा आण्णा जाधव, उपशहरप्रमुख प्रशांत बापू साळुंके, बालाजी सुरवसे, दिलिप जावळे, विधानसभा संघटक तथा डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, पंकज पाटील, अभिजित देशमुख, युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Related posts