Blog

7 डिसेंबर सशस्त्र सेना — – दिन- – ध्वजदिन

लेखक
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

मित्रांनो, आज सात डिसेंबर. सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. आजच्या या ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! ध्वज दिनाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे. ध्वज दिन म्हणजे नेमके कशासाठी असतो? कशासाठी साजरा केला जातो? त्या पाठीमागे उद्देश काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊया. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुद्धा भारतीय सैन्याचा सेवेतील सैन्याचा गौरव केला जात असे. परंतु त्यांना पैशाच्या स्वरूपात कुठलीही मदत मिळत नसेल तेव्हा भारतीय सैन्याचा सन्मान माजी सैनिकांचा सन्मान सेवेतील कार्यरत सैनिकांचा सन्मान करण्यासाठी 28 ऑगस्ट 1949 रोजी भारत संरक्षण मंत्रालयाने एक विशेष बैठक घेऊन त्या बैठकीत सात डिसेंबर रोजी ध्वज दिन साजरा करावा असे ठरले. या दिवशी संपूर्ण भारतात विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ध्वज निधी जमा करतात व त्याचा उपयोग देशासाठी शहीद झालेल्या सर्व सैनिकांच्या कुटुंबासाठी केला जातो.

खरोखरच हा ध्वज निधी किती मूल्यवान किती महत्वपूर्ण व किती चांगल्या कार्यासाठी जातो. हे आपणा सर्वांसाठी एक भाग्याचा दिवस आहे. देश सेवा करण्याचा एक महान कार्य करण्याचा आज दिवस आहे. आपल्या कळत नकळत देशाची सेवा आपण करत असतो. आपला ध्वज तिरंगा आहे . तीन रंगाचा सुंदर डोलदार मध्यभागी अशोकचक्र आहे. ते आम्हा सर्व भारतीयांना नव्हे तर, संपूर्ण जगाला गति प्राप्त करण्यात त्याचे प्रतिक आहे. सदैव गती देण्याचे कार्य प्रेरणा देण्याचे महान कार्य करते. सशस्त्र सेना ध्वज दिन असेही या दिवसाला संबोधले जाते. भारतीय सेना अध्यक्षांच्या हाती संपूर्ण कारभार असतो. देशाच्या संपूर्ण सेनेचा सन्मान गौरव करण्याचा हा सशस्त्र सेना झेंडा दिवस म्हणून साजरा केला जातो. यामागील प्रमुख उद्देश असा आहे ध्वज निधी म्हणून जमा झालेली राशी युद्धामध्ये झालेल्या शहीदांच्या कुटुंबासाठी, युद्धा मध्ये दिव्यांग झालेल्या विकलांग झालेल्या सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच सध्या कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी जे सैनिक रात्रंदिवस 24 तास देशाची सेवा करतात, आपल्या कुटुंबापासून दूर परिवारापासून दूर राहून तळहाती प्राण घेऊन लढतात, प्राणपणा ची झुंज देतात त्यांच्या गौरवा प्रति शहिदांचा सन्मान गौरव करण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो.

प्रत्येकाने आपापल्या परिने ध्वजनिधी जमा करून देश सेवा केली पाहिजे 🙏🏻🙏🏻

धन्यवाद।

Related posts