करमाळा

ग्रामीण भागातील मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करावे-अंगद देवकते.

करमाळा :- प्रतिनिधी:-
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील मायक्रोफायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवुन सदरची कर्ज माफी तात्काळ करावी. करमाळा तालुक्यात ग्रामीण भागातील मायक्रो फायनान्स, बंधन कर्ज, ग्रामीण कुटा, एल अँड टी, idfl यासारख्या अनेक खासगी मक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात छोटे मोटे कर्ज वाटप केले आहे.अशा बॅकेचे कर्जदार सर्व महीलाच आहेत.7ते15महिला गटांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.महीला मोलमजुरी करून हप्ते भरत असतात. परंतु सध्या कोविड रोगाच्या साथीमुळे ग्रामीण भागातील महीला कर्जदाराचे आर्थिक चक्र थांबले आहे, हताला काम नाही,दुष्काळ परिस्थितीने रोजगार बुडाले आहे. त्यामुळे कुठल्याही कर्जाचे हप्ते महिला भरू शकत नाहीत. केंद्र सरकार व पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रकारची कर्जवसुली स्थगित केल्याचे अदेश देऊनही अनेक मायक्रोफायनान्स कंपन्या महीलांच्या घरी जाऊन आजही जाचक बळजबरीने कर्जवसुली करत आहेत. वसुलीला गेलेले एजंट कर्जदाराच्या घरी जाऊन अपशब्द वापरून अपमानास्पद बोलून जबरदस्तीने कर्जाचे हप्ते भरायला लावत आहेत.अनेक बॅंक खात्येदांरांच्या खात्यातील परस्पर पैसे सुध्दा कट करून घेत आहेत.

तालुक्यातील विविध मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जाचक कर्जवसुली थांबवावी आणि संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे. सदरील कर्जवाटप हे ग्रामीण भागात गरीबातील गरीब महिलांना केले आहे. ही कुटुंबे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे कर्ज फेडण्यास असमर्थ झालेली आहेत.अनेक लोकांचे चुली पेटण्याची नामुष्की झाली आहे. अशा जाचक कर्जवसुली चालू राहिली तर भविष्यात आत्महत्यांचे सत्र सुरू होऊ शकते.अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्यातील मायक्रोफायन्स कंपन्यांच्या एजंटला तालुक्यात फिरवू देणार नाही.कुठल्याही फायनान्स ने त्रास दिल्यास आमच्या शी संपर्क साधावा. तरी आपण संबधीत मायक्रोफायनान्स कंपन्यांना कर्जवसुली थांबवण्याच्या सूचना देऊन सदरचे कर्ज माफ करण्यात यावे. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्रद्वारे विनंती केली आसल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अंगद देवकते यांनी दिली आहे.

Related posts