उस्मानाबाद  तुळजापूर

“माझे ग्राहक, माझी जबाबदारी” योजनेअंतर्गत पिंपळा (बु) येथे ग्राहकांची तपासणी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – पिंपळा (बु.) ता. तुळजापूर येथे “माझे ग्राहक, माझी जबाबदारी” उपक्रम राबवत रेशन दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत रेशन दुकानदार बालाजी चुंगे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु) येथे रेशन दुकानात दुकानदार श्री. बालाजी चुंगे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. बालाजी चुंगे यांनी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझर हे अनिवार्य केले आहे. सॅनिटायझर ची व्यवस्था ही दुकानात करण्यात आली आहे. याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान व ऑक्सिजन लेवल ये यंत्राद्वारे तपासून च ग्राहकांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. ग्राहकांच्या आरोग्यासाठीच हे कठोर नियम लादले गेले असल्याचे यावेळी श्री. बालाजी चुंगे यांनी सांगितले.

दुकानात मास्क, सॅनिटायझर वापर, तापमान, ऑक्सिजन लेवल तपासणी तसेच सोशल डिस्टनसिंग अशा प्रकारच्या सर्व शासकीय नियमांचे पालन करून ग्राहकांच्या आरोग्यासाठी कठोर पावले उचलल्या बद्दल सर्वत्र रेशन दुकानदार श्री. बालजी चुंगे यांचे कौतुक केले जात आहे.

ग्राहकांच्या आरोग्यासाठी च हे कठोर पाऊल

सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा महामारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या महामारीपासून दुकानात येणाऱ्या नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी च आम्ही दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क हे अनिवार्य केले असुन दुकानात सर्वांसाठी सॅनिटायझर तसेच ऑक्सिजन लेवल तपासणी व तापमान तपासणी व्यवस्था केली आहे.

– श्री. बालाजी चुंगे (रेशन दुकानदार तथा ज्येष्ठ नेते पिंपळा बु.)

Related posts