तुळजापूर

रामतीर्थ बॅरेज क्र नं १ मध्ये आढळली मगर

पुरूषोत्तम विष्णु बेले,
नळदुर्ग / प्रतिनिधी

नळदुर्ग येथील आलियाबद शिवारात बोरी धरणावर बांधलेल्या बॅरेज क्र १ या बंधार्यावर दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांना मगर दिसून आल्याने शेतकर्यांमध्ये दहशत पसरली होती २४ रोजी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पहाणी केली असता सायंकाळी ५ फुटाची मगर आढळल्याची माहिती तुळजापूर वनक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली आहे.

सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गलगत आलियाबाद पुलाजवळ बॅरेज क्र १ मध्ये पहील्यांदा मगर आढळल्याची शेतकरी सांगत होते. मगर आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, वनक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी मगर आढळल्याच्या बातमी ला दुजोरा दिला असून दोन महिन्यापुर्वी झालेल्या अतिवृष्टी मध्ये मगर आली असल्याचा अंदाज वर्तवला आहे दरम्यान परिसरातील नागरिक व शेतकरी, मच्छीमार यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts