अक्कलकोट

कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस, आरोग्य, प्रशासकीय, पत्रकारिता व अन्य क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
कोरोना महामारीच्या  काळात शासकीय, प्रशासकीय अधिकारी, पोलीस खात्यातील सर्व अधिकारी ,कर्मचारी यांनी कोरोनाच्या काळात काम केले आहे .सुरुवातीला काही वादाचे प्रसंग निर्माण झाले पण नंतर सर्व नागरिकांनी सहकार्य केले आपण सर्व कोरोना योद्धयानी लोकसेवेचे काम प्रामाणिकपणे केलात. म्हणून आपल्या पाठीवर थाप मारण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्था व UG मित्रपरिवारने केले आहे हे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस, आरोग्य, प्रशासकीय, पत्रकारिता व अन्य क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्था व UG मित्र परिवाराकडून सन्मानचिन्ह,आहेर देऊन १२६ कोरोना योद्धयाचां सन्मान करण्यात आला .अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे ,शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख ,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक जितेश यारोळे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, माजी नगराअध्यक्षा डॉ . सुवर्णा मलगोंडा ,नगरसेवक महेश हिंडोळे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे ,माणिक बिराजदार, माजी नगरसेवक, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक व संस्थेचे संस्थापक उत्तम गायकवाड यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, संजय देशमुख ,महेश हिंडोळे, दिलीप सिद्धे, यशवंत धोंगडे, डॉ . सुवर्णा मलगोंडा आदींनी मार्गदर्शन करत कोरोना योद्ध्यांच्याकार्याचे कौतुक केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, सोनाली गोडबोले ,देवेंद्र राठोड ,पोलीस कर्मचारी यमाजी चव्हाण, धनराज शिंदे, वसुधा माळी, ज्योती सगमुळे,लक्ष्मी हडपद, दीपक शिंदे ,गजानन गायकवाड, रफिक बिराजदार ,नामदेव माने , महादेव चिंचोळकर , प्रभावती गाजरे, अनिल चव्हाण, संदिप सोमवंशी, चिदानंद ढाले, अंबादास दुभभाते, गोपाळ बुक्कानवरे, उत्तम चव्हाण, अंजना कोळी, ज्योतीबा माळी , शारदा हिप्परगी, व्यंकटेश सुतार व अन्य पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ . सुवर्णा मलगोंडा , वैदयकिय अधिक्षक डॉ .अशोक राठोड डॉ . सतीश बिराजदार ,डॉ . रोहन वायचळ, डॉ . इरण्णा पाटील ,डॉ . आदित्य कोतवाल ,डॉ . अनिल बोरगावकर ,डॉ . गिरिष साळुके, डॉ निखिल क्षिरसागर आदींचा सत्कार करण्यात आला. तर प्रशासकीय सेवेतील प्रियांका गोरे, वैशाली नन्ना ,मल्लय्या स्वामी, विठ्ठल तेली ,मलिक बागवान ,भागवत सांगोलकर ,प्रवीण सावंत, निलेश सोनवणे, महबूब शेख ,पल्लवी पाटील ,रोशनी जमदाडे ,धनराज कांबळे व अन्य कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार गायकवाड ,स्वप्निल गायकवाड, प्रदीप सर्जन ,सागर सुतार,अमोल पुटगे,साई गायकवाड,स्वप्निल गायकवाड,सागर सुतार, प्रिन्स शिंदे,स्वामी बनसोडे,संदिप गायकवाड,स्वामी कदम ,दत्ता शिंदे,अजय मडीखांबे,अंकुश गायकवाड,आकाश गायकवाड,नितेश मडीखांबे,योगेश मडीखांबे, लखन वेसकार,रोहित पटणम,चेतन भाऊ गायकवाड,सुनील मडीखंबे,आदित्य मडीखांबे,निकेश मडीखांबे,विजय गायकवाड,संदिप छत्री,किरण गायकवाड, सुदर्शन गायकवाड,अनिकेत मडीखांबे,पप्पू इब्रामपूर,अक्षय सोनवणे,पप्पू शिंदे,सागर घटकांबळे,गंगाराम वाघमारे, अभिषेक मडीखंबे,श्याम गायकवाड,ऋतुराज कांबळे, योगेश सुतार, संघर्ष सदाफुले, कार्तिक मडीखंबे, संदीप कसबे, शंकर जाधव आदीनी परिश्रम घेतले.

Related posts