अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यासाठी कोरोनाची लस त्वरीत उपलब्ध करुन द्यावी – अविनाश मडिखांबे

अक्कलकोट (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्वत्र कोरोनाने महामारीने थैमान घातले आहे. अश्यात सरकारने कोरोनाची लस सर्वानी घ्यावे अशी सूचना दिली आहे. तरी अक्कलकोट तालुक्यात गेल्या आठवढ्या भरापासून कोरोनाची लस उपलब्ध नाही. तसेच महाराष्ट्र सरकारने एक मे पासुन अठरा वर्षा पुढील सर्वांना लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात ही घोषणा कागदावर आहे. त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसून येत नाही.

अद्यापही अक्कलकोट तालुक्यात लस उपलब्ध झालेली नाही तरी तात्काळ अक्कलकोट तालुक्यासाठी लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी यावरती ताबडतोब सहानुभूती पुर्वक विचार करून कोव्हीडची लस उपलब्ध करुन कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. सध्या अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोव्हीड सेंटर मध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी अक्कलकोट शहरातील महाविद्यालय तसेच नगरपरिषदेचे मंगलकार्यालय, शाळा ताब्यात घेऊन रुग्णांची सोय करावी.

तसेच कोव्हीड सेंटर मध्ये डॉक्टर तसेच नर्सची संख्या अत्यल्प असल्याने रुग्णावर वेळीच उपचार होताना दिसून येत नाही. त्यामुळे डॉक्टर व नर्स तसेच सहाय्यक यांची भरती करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार अंजली मरोड यांना रिपाइंच्या वतीने अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुरेश गायकवाड, अंबादास गायकवाड उपस्थित होते.

Related posts