उस्मानाबाद 

कोरोना टेस्टिंग लॅब मध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा “कोरोना वारीअर्स” म्हणून सत्कार

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

दि.11/10/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबाद मधील सुरू केलेल्या नवीन कोरोना टेस्टिंग लॅब मधील सर्व अधिकारी, विद्यार्थी तथा कर्मचाऱ्यांना “कोरोना वारीअर्स” म्हणून सन्मानित करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर येथे सुरु असलेल्या कोरोना टेस्टिंग लॅब मधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी हे मागील कित्येक महिने निरंतर जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूच्या टेस्टींग चे काम करत आहेत. त्याचा कार्याचे मोल हे होणार नाही. पण त्यांचे आभार मानून मा. जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीतील “Corona Warrior’s” प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गौरव कार्यक्रमात योगायोगाने टेस्टींग लॅबचे प्रमुख असलेलेले माजी संचालक तथा मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख तथा कोरोना टेस्टिंग सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत दीक्षितसर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यांप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य – मा. संजय निंबाळकर, उपपरिसराचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, सिविल डॉक्टर -डॉ. साबळे, डॉ.कापसे, सिविल टेक्निसियन – इम्रान मोकाशी, काझी तौसिफ, अशोक ठोंबरे, सुप्रिया मुळे, शिवराज शिवणकर, लॅब सहाय्यक – कृष्णा मगर, रोहित हुकिरे, महेश देशमुख, उत्तरेश्वर सुरवसे, शुभम मगर, डेटा ऑपरेटर – नागनाथ दंडगुळे , मोहसीन वस्ताद इ. मान्यवर उपस्थित होते.

Related posts