Blog

कोरोनामुळे उद्योगधंदे आले अडचणीत..

कोरोना या जागतिक महामारी रोगामुळे जगातील इतर देशांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्स्थेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले आहे. सर्व उद्योगधंदे बंद ठेवावे लागल्यामुळे उत्पादक, ग्राहक , कामगार मजूर यांना आर्थिक संकटांना समोरे जावे लागत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी 22 मार्चपासून अत्यावश्यक असणार्‍या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्यांनाा त्रास जरी होत असला तरी गरजेच्या या उपाययोजनांमुळे कोरोेना रोगापासून सर्व सामान्य नागरिकांना दूर ठेवण्यास मदत झाली आहे. मात्र शेतकरी वर्गाचे या रोगामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सुरु आहे. शेतात कष्ट करुन पिकविलेल्या शेतमालाला मार्केट उपलब्ध नसल्यामुळे त्याला शेतमाल कवडीमोेल दराने विकावा लागत आहे. या महामारी रोगाने कृषीप्रधान म्हणून ओेळखल्या जाणार्‍या भारत देशाला सर्वाधिक आर्थिक संकटात टाकले आहे. केंद्र व राज्य सरकार योेग्य त्या सर्व उपाययोजना राबवून कोरानाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे स्वस्त कच्चे तेल व कमी महागाई सोडल्यास इतर सर्व बाबींमध्ये निराशाजनक परिस्थिती आहे. निर्यातील मोठी घट मागणीमधील तफावत मंद गतीचा विकासदर विस्कळीत झालेल्या बाजारपेठेा व पुरवठा साखळ्या, बेरोजगारी रुपयाचे अवमूल्यन या सर्व गोेष्टीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी हानी पोहोचली आहे. सर्व कंपन्या उद्योगधंदे बंद पडल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली. व त्याचा ऋणात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे.

वर्क फॉर्म होेम मुळे काही प्रमाणात आयटी व संलग्नीत कंपन्यांचे का सुरु आहे. मात्र कच्च्या मालावर प्रक्रिया करुन नवनवीन उत्नपादने बनविणार्‍या उद्योगधंद्यांवर कुऱ्हाड कोेसळली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योेग,सेवा, शेती संलग्नित व्यवसायंना बसला आहे. व्यापार व उद्योगधंद्यांच्या बंद अवस्थेमुळे महसूली उत्पन्नात मोठ्या प्र्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात खर्च बचत व गुंतवणूक करताना सर्वानाच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
लॉकडाऊनमुळे उत्पादित मालाला मागणी कमी झाल्यामुळे बाजार कोलमडून पडला आहे. शेअर मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून येत आहे. भुसार मालाची दुकाने, सलून हॉटेल, लॉज वडापाव भजी बनविणारे हातगाडेवाले, हातगाड्यांवर भाजीपाला फळे विकणार्‍या ज्यांचे हातावर पोट आहे. अशा सर्व लोेकांना दोन वेळच्या जेवणाचीही अडचण. या कोेरोनामुळे पडली आहे. रिटेल, हॉॅटेल या क्षेत्रातील 5 कोटींहून अधिक कर्मचार्‍यांवर बेरोजगारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातून मिळणारा 20 ते 25 टक्के महसूल बुडल्यामुळे आर्थीक तोठ्यात भर पडत आहे. या महामारीमुळे खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या नोकर्‍यांवर गडांतराचे सावट तयार झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे.
भारत देश तसेच महाराष्ट्र पर्यटन क्षेत्ररात आघाडीवर आहे. मात्र या रोेगाने पर्यटन क्षेत्राला हजारो कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी पर्यटन स्थळे ओस पडली आहेत. किंबहुना पर्यटक नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. महामारीमुळे गरजेच्या वस्तूची आवक-जावक कमी प्रमाणात असली तरीही येणार्‍या काळात ई-व्यापार जास्त प्रमाणात चालण्याची चिन्हे आहेत. तर छोटे-मोठे व्यापारी व दुकानदार यांना अडचण येण्याची शक्यता दिसत आहे. तरी परिस्थिती लवकरच पूर्वपदावर आली तरी उद्योगधंदे व कंपन्यांना मजूरांचा तुटवडा भासेल. स्थलांतरीत झालेले लाखो मजूर कामावर रुजू होण्यास जास्तीचा कालावधी जाईल व अशातच बेरोजगारीत आणखी वाढीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी झळ मात्र अर्थव्यवस्थेलाच बसेल.
कोरोनापासून बचावासोबतच अर्थकारणाकडे लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे. विस्कळीत झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणणेसाठी मोठी कसरत करावी लागेल.त्यासाठी आवश्यक त्या ससर्व उपाययोजनांचा अवलंब करुन उद्योगधंदे, कंपन्या व्यापार शेती, हॉटेल व इतर धंद्याांनाही नवसंजीवनी देण्याची गरज आहे.त्यासाठी परकीय गुंतवणूकीस प्रोेत्साहन देणे गरजेचे आहे. देशातील नव उद्योजकांना चालना देवून उद्योगवाढीसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणेसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक व विकसित देशांकडू अर्थसहाय्य घेण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. कोेरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे उद्योगधंदे मोडकळीस आले आहेत. त्यांना सरकारकडून विशेष सवलती व आर्थिक पाठबळ दिल्यास ते पुन्हा जोमाने उभे राहतील महत्वाचे म्हणजे अनावश्यक खर्चात कपात करणे गरजेचे आहे. तसेच जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर ही देशांतर्गत आथिर्र्क चलन फिरवण्यास मदतगार ठरणार आहे.एकंदरीत विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे हेही प्रमुख आव्हान आज आपल्या सर्वांवर आहे. दिवस निघून जातील व अर्थकारण पुन्हा जोेमाने फिरेल यात तिळमात्र शंका नाही.
डॉ .रणजित पाटील
कृषी अर्थ तज्ञ/प्राचार्य लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन
Mobil number -8275948034

Related posts