तुळजापूर

पिंपळा (बु.) येथे आढळला कोरोना रुग्ण

साईनाथ गवळी,
तुळजापूर प्रतिनिधी.
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) गावामध्ये कोरोना रुग्ण आढळून आला आहे. पिंपळा (बु.) या गावातील एका आजारी व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी गावातील रुग्णाच्या घराकडील भाग सील करण्यात आला असून, ग्रामपंचायत कार्यालयाने याची खबरदारी घेत, त्या परिवाराला होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. या परिवाराची सर्व दैनंदिन जबाबदारी स्वीकारत त्यांना सर्व गरज जागेवर भागावण्याची व्यवस्था केली आहे. यावेळी उपस्थित असलेले विविध प्रशासकीय अधिकारी, शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा. सरपंच जगन्नाथ गवळी यांच्यासह मा. उपसरपंच बालाजी खराबे, सरपंच बाळू सिरसट, उपसरपंच दशरथ पाटील, सदस्य विष्णू चौगुले, भरत चौगुले, विष्णू गवळी, दत्ता पाटील, हरी वडणे, सुरेश बागल यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी गावामधील नागरिकांना धीर देत न घाबरता आलेल्या संकटावर मात करण्याचे आव्हान केले आहे.

कृपया कोणीही न घाबरता शासनाच्या विविध नियमांचे पालन करून आपण सर्वजण या आलेल्या संकटावर मात करू. लवकरच शिवसेना धाराशिव परिवारातर्फे गावामध्ये “आर्सेनिक अल्बम” या गोळ्यांचे वाटप करण्यात येईल. ग्रामपंचायत कार्यालय आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. कृपया नागरिकांनी न घाबरता प्रशासनाला सहकार्य करावे.
-जगन्नाथ गवळी (शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)

Related posts