भारत

राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रकोप थांबेना! शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद

कोरोनाचे संकट वाढत असले तरी दिल्लीत लॉकडाऊन लावला जाणार नाही पण निर्बंध कठोर केले जातील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात जाऊन केजरीवाल यांनी तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, रुग्णालयाचे संचालक डॉ. सुरेश कुमार, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष राघव चढ्ढा हेही उपस्थित होते.
गेल्या काही काळापासून पूर्ण देशात कोरोनाचे संकट वाढत चालले असल्याचे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्लीत सध्या कोरोनाची चौथी लाट आलेली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये आलेल्या लाटेनंतर रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर यंत्रणेत ढिलेपणा आला आणि याच्या परिणामी पुन्हा रुग्णसंख्या वाढतील झाला आहे. नोव्हेंबरमध्ये डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य सेवकांनी चांगल्या पध्दतीने काम केले होते. पुन्हा असे काम या लोकांना करावे लागणार आहे.
कोरोना रोखण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांना लस दिली पाहिजे. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. डोसेसची उपलब्धता वाढविणे तसेच लसीकरण केंद्रांच्या नियमावलीत बदल केले तर वेगाने लोकांना लस देता येईल. सर्व लोकांना लस देण्यात आली तर कोरोनाची गंभीरता कमी होईल. दिल्लीत सध्या सात ते दहा दिवस पुरेल इतका लसीचा साठा आहे असे केजरीवाल म्हणाले.

Related posts