कविता 

कोरोणा बाई- – – – – – –

हे महामारी कोरोणाबाई
नविन वर्षात येण्याची
करू नको घाई!!

झाले ते पूरे झाले
बघता, बघता वर्ष संपले
तु सम्पूर्ण जगावर
अधिराज्य केले आता
पळता थोड़ी झाली भुई
नविन वर्षात येण्याची
करू नको घाई !!

लाखो बेघर झाले
लाखो जीव सोडून गेले
भूक मारीने काही गेले
उपवास पोटी काही मेले
माणूस माणसात राहिला नाही
नविन वर्षात येण्याची
करू नको घाई !!

देवालय,विद्यालय, वाचनालय
बंद, भाजीपाला,फळे, दूध बंद
सगळेच कसे लोकडाउन झाले
मांनसामांनसात प्रेम राहिले नाही
हे कोरोनाबाई नविन वर्षात
येण्याची करू नको घाई

हे कोरोनामाई जाण्याची तू आता कर घाई!!
🙏🏻🙏🏻

कवि
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर।

Related posts