तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात संविधान दिन साजरा.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी (26 नोव्हेंबर),

संपूर्ण भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता ,बंधुता , न्याय, समान हक्क या संविधानातील लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषांगाने यार्षी 26 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता मा. राष्ट्रपती महोदय श्री रामनाथ कोविंद संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करणार होते. त्यानुसार श्री तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे याप्रसंगी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही. बी.व पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितित शासनाने ठरविलेल्या कोविड -19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन जसे – मास्कचा वापर करणे , विहित शारीरिक अंतर ठेवणे , निरजंतुक करणे इ. बाबींची योग्य खबरदारी घेउन संविधान दिन साजरा करण्यात आला.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही. बी.व पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता 26 /11 मुंबई वर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित करून करण्यात आली. या कार्यक्रमाचा छायाचित्रासह अहवाल माननीय महोदय गटशिक्षणाधिकारी तुळजापूर यांना पाठविण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयातील पर्यपेक्षक डॉ. पेटकर सुभाष, सुरवसे भीमा, वाडीकर सुनिल, रमाकांत स्वामी, देविदास पांचाळ, डॉ.विजय वडवराव ,श्री पडणूर राजेश, श्री बिलकुले राजेश, श्री कुलकर्णी आनंद, श्री सुत्रावे तुषार ,श्री चव्हाण सुनिल,श्री सचिन राजोळे, श्री श्रीनिवास कदम ,श्री भोलेनाथ लोकरे, श्रीमती अक्काताई पाटील मँडम,श्रीमती सारिका तोडकरी मँडम,कु.नालंदा माने, श्रीमती नाशे मँडम तसेच शिक्षण निदेशक सुभेदार गुंडू सोनकांबळे, सुभेदार सिराज खान, सुभेदार दत्तात्रय कुलकर्णी तसेच हरीभाऊ कुलकर्णी, अशोक खुने, कल्पना मोरे मँडम,राजाभाऊ लोंढे, सुशांत रणदिवे, श्री माधव ममदे ,जलील हिप्परगी, पांडुरंग जेटीथोर,मगर मामा इ. कर्मचारी उपस्थित होते.

Related posts