शेतशिवार

पिकांचा भरघोस उत्पन्ना साठी जीवाणू खते संवर्धन व वापर -प्रा. बुरगुटे के. ए.

जीवाणू खत संपूर्ण सेंद्रिय व सजीव असल्याने त्यामध्ये कोणताही अपायकारन ,टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही .हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना पुअलब्ध करून देणा-या जीवाणींची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जिवाणू खते असे म्हणतात .ह्या खतांमध्ये पीकांच्या प्रकारानूसार जीवाणू वापरल्या जातात.

१) एझोटोबँक्टर जीवाणू खते –
या खतातील जिवाणू एकदल व तूणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदा. गहू ,ज्वारी ,बाजरी ,भात ,कपाशी इ.

एझोटोबँक्टर

२) रायझॊबियम जिवाणू खते –
हे जिवाणू फक्त शेंगवर्गीय / द्विद्ल पिकासाठी उपयोगी पडते .परंतु निरनिराळ्या पीकासाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम जिवाणूचे खत वापरावे लागते .

रायझॊबियम

काही महत्त्वाचे पीकांचे गट पुढे दिले आहेत.

पीके – जीवाणू खत
सोयाबीन – रायझोबियम जापोनिकम ,रा.इटलाय ,रा.फ्रिडाई
वाटाणा – रा .लग्युमिनोसायरम
हरभरा – रा . सिसीराय
चवळी,मुग ,तूर ,मटकी इ. – रा . जीवाणूचा प्रकार
बरसीम – रा . ट्रायफेली
फ्रेंच बीन / बीन – रा .फँझिओलाय

३) स्फुरद विरघळणारे जीवाणू खत –
निसर्गात काही जीवाणू असे आहेत की जे अविद्राव्य स्थितीत असणा-या स्फूरदांवर प्रक्रिया करतात . ह्या प्रक्रियेत सुक्ष्म जीवाणू उदा. बँसिलस ,सुडोमोनेस, पेनीसीलीयम ,अँस्परजीलस इत्यादी विशिष्ट प्रकारच्या आम्लांची निर्मिती करतात ,ज्यामुळे अविद्राव्य स्फुरदाचे विघटन होवून स्फुरद पीकांना उपलब्ध होतो.
इतर जीवाणूचे उदा. अँसिटोबँक्टर व अँझोस्पिरीलम ऊसासाठी वापरतात .त्याचप्रमाणे व्हि .ए . मायकोरायझा अँक्टोनोमायसेटस इ . वेगवेगळ्या पीकांकरिता वापरले जातात .जिवाणू खत वापरल्य़ाने पीकांची रोगप्रतिकार्क शक्ती वाढते .

जैविक खते वापरण्याच्या पध्दती –

१) बीज उपचार पध्दती :-साधारणत: २५० ग्रँम जीवाणू खत दहा ते पंधरा किलो बियाण्याकरिता पुरेसे होते.

जीवाणू खते संवर्धन व वापर – एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रँम गुळ मिसळून द्रावण तयार करावे .द्रावण थंड करून नंतर त्यात एका थैलीतील संपूर्ण संवर्धक मिसळावे .बियाणे फरशी ,ताडपत्री अथवा बारदानावर पसरवून व त्यावर हे मिश्नण शिंपडून हलक्या हाताने संपूर्ण बियाण्यास लागेल .अशा पध्दतीने चोळावे .नंतर सावलीत वाळवावे ,हे बियाणे चोवीस तासाचे आंत पेरणीसाठी वापरावे .जर माती आम्लीय असेल तर बियांना १ किलो चुन्याच्या निवळीसोबत मिसळून पेरणी करीता वापरावे.

२) मूळांवर उपचार पध्दतीरोपटे लावून लागवड केल्या जाणा-या पीकांसाठी ही पध्दती वापरतात.

एका बादलित किंवा छोटया ड्र्ममध्ये प्रत्येकी १ ते २ किलो नत्रयुक्त किंवा स्फुरद युक्त जैविक खते घ्यावीत ,त्यात पुरेसे पाणी घालावे .(एक एकरात किती रोपटे लावयची आहेत त्यानुसार ५ -१० लिटर पाणी घ्यावे .) ह्या मिश्नणात लागवडकरण्यापूर्वी रोपट्याची मुळे २५ -३० मिनीटे बुडवून ठेवावी .

Related posts