पंढरपूर

युटोपियन शुगर्स च्या ७ व्या गळीत हंगामाची सांगता ; ऊस उत्पादकांच्या विश्वासावरच चालू गळीत हंगामात ५ लाख मे.टन गाळप पूर्ण.

कामगारांनाही देणार भरघोस पगार वाढ :- उमेश परिचारक

पंढरपूर : – कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स या कारखान्याच्या ७ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ सोमवार दि.२२/०२/२०२० रोजी चेअरमन उमेश परिचारक व सर्व खाते प्रमुख यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. या चालू गळीत हंगामात युटोपीयन शुगर्स ने ५ लाख मे.टनाचे ऊस गाळप पूर्ण केले आहे.यावेळी वाहन ट्रॅक्टर पूजन कारखान्याने टेक्निकल जनरल मॅनेजर तुकाराम देवकते यांच्या हस्ते करण्यात आले .

स्वागत व प्रास्ताविक करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या हितासाठी युटोपियन शुगर्स या साखर कारखान्यांची निर्मिती केली.ते कारखाने टिकणे व टिकवणे ही काळाची गरज आहे. आपल्या युटोपियन शुगर्स ने चालू वर्षी कारखान्याने जास्तीचे ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, पुर परिस्थिति मुळे नदीकाठच्या भागातील कारखान्याच्या नोंदीतील ऊसाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी मूळे टनेजमध्ये घट झाली,शेती विभागाच्या नियोजना प्रमाणे ऊस गाळपासाठी थांबण्याची मानसिकता बदलून चालू हंगामा मध्ये जास्तीचा ऊस असल्यामुळे आपला ऊस वेळेत गाळपास न गेल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होईल या भीतीने मिळेल त्या ठिकाणी ऊस घालवण्याची मानसिकता ऊस उत्पादक यांची झाली आहे. ,अशा परिस्थिति मध्ये ही युटोपियन शुगर्स ने ५,००,००० मे.टन ऊसाचे गाळ्प केले आहे, हंगामाच्या सुरवातीला सलग दोन महिने ८.५% ते ९% इतकी कमी रिकव्हरी मिळाली पुढे त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही व ती १० च्या आसपास राहिली. कारखान्याने एकूण गाळपाच्या ८८% कोएम-०२६५ या जातीच्या उसाचे क्राशिंग केले आहे. ह्या जातीचा ऊस किमान पंधरा महिन्यानंतर गाळपसाठी आणला पाहिजे तरच १०% पेक्षा जास्त रिकव्हरी मिळू शकते. परंतु सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत व त्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा ऊस लागवड कमी प्रमाणात आहे, त्यामुळे साखर कारखान्यामध्ये ऊस नेण्यासाठी स्पर्धा निर्माण होते त्याचा फटका रिकव्हरीला बसतो त्यामुळे सर्वच कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. साखरेला उठाव नसल्याने साखर विक्रीवर व दरावर त्याचा परिणाम झाला आहे. साखरेचा किमान विक्री दर ३६ रु. करणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या जिल्ह्यातील कारखानदारी मोडून पडेल. अशा कठीण काळात ऊस उत्पादक यांनी युटोपियन शुगर्स वरती विश्वास टाकून सहकार्य केले बद्दल ऊस उत्पादक यांना, तसेच ऊस तोडणी कामगार, वाहन मालक, कारखान्याचे सर्व सप्लायर, व्यापारी, साखर व्यापारी,कारखान्याच्या प्रगती मध्ये ज्या-ज्या घटकांचा सहभाग आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.

शासनाने इथेनॉलचे अतिशय उत्तम धोरण निश्चित केले त्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानतो. जास्तीतजास्त ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले पाहिजे पण त्यासाठी आसवानी प्रकल्पात वाढ करण्यासाठी मोठया भांडवलाची गरज आहे,तरच शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होईल. कारखान्याने ४५ केएलपीडी आसवाणी प्रकल्पातून बी – हेव्ही मोलॅसेस पासून इथेनॉल ची निर्मिती करून शासनाकडे इथेनॉल पुरवठया साठी १ कोटी लिटर चे टेंडर ही भरले आहे. त्यानुसार सध्या शासनाच्या तेल कंपनी यांना इथेनॉल पुरवठा चालू आहे . सदर टेंडर नोव्हेंबर २०२१ पर्यंत युटोपियन पूर्ण करणार आहे.

कारखान्याच्या प्रगती मध्ये कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कष्टावरच या कारखान्याची विविध क्षेत्रा मध्ये प्रगती होत आहे. त्या करीता त्यांची पगार वाढ करणे गरजेचे आहे. मुळात हा कारखाना हा या भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने काढला आहे. त्यामुळे या कारखान्यातील कर्मचारी याची किमान पगार ही ७८०० रु.अशी करण्यात येणार असून सदरची वाढ ही कारखाना प्रशासनाने या पूर्वीच जाहीर केल्या प्रमाणे जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच कामगाराच्या गुणवत्ते नुसार त्यांना ही भरघोस अशी पगार वाढ करण्यात येत आहे. किमान वेतन ठरविणारा युटोपियन हा कदाचित पहिलाच खाजगी साखर कारखाना असेल असे मत ही त्यांनी व्यक्त केले.

आगामी काळात मागील गळीत हंगाम यांचा अभ्यास करता आधिकाधिक जोमाने काम करण्यासाठी आपण सर्वांनी साथ देण्याची गरज असल्याचे मत ही उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.

सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.

Related posts