उस्मानाबाद 

कळंब-ढोकी रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे बांधकाम मंत्र्याकडे तक्रार

उस्मानाबाद प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब ढोकी रोडचे तांत्रीक मापदंडाचे पालन न करता, त्याची माहिती दडवत काम मार्गी लावले जात असलेबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. मुस्तान मिर्झा यांनी सदरील तक्रार केली आहे. कळंब तेर ढोकी या राज्यमार्गाचा विकास सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड अन्युईटी उपक्रमांतर्गत करण्यात येत आहे.

यानुसार एका बाजूचं काम करण्यात आलं असून सद्या दुसर्या बाजुच काम करण्यात येत आहे. सदर काम तांत्रीक मापदंडानुसार, अंदाजपत्रकात नमूद असलेल्या मानकानुसार होत नसून यासंबंधी विचारणा करण्यास गेले असता गुणवत्तेसाठी नेमलेली खाजगी एजन्सी व बांधकाम खात्याचे अधिकारी टोलवाटोलवी करत माहिती देण्यास टाळत आहेत. यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी तक्रार मिर्झा यांनी आपल्या निवेदनात केली आहे.सदर कामाचे खोदकाम, त्यात केले जाणारी भराई, यासाठी वापरले जाणारे मटेरियल, त्याचे नियमानुसार उंची असलेले थर व त्याची दबाई या बाबी योग्य होत नाहीत. यामुळेच एका बाजूला झालेल्या कॉंक्रिट रस्त्याला अनेक ठिकाणी तडे जात एका महिन्यातच बोगसपणा उघडा पडला आहे. शिवाय शहरात पुर्ण रूंदी च्या रस्त्याचे काम करणं गरजेचं असताना केवळ १४ मिटर काम करत उर्वरीत लांबी सोडुन देण्यात आली आहे. शहरी लांबी असलेल्या सर्व भागात दुभाजक नाही. नालीचे काम प्रस्तावीत केलेले नाही. पोळ शिफ्टचं विषय आहे. एकूणच कोट्यावधी रूपये खर्च करून बांधकाम खाते, संबंधीत खाजगी एजन्सी व ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गी लावल्या जात असल्याचं मिर्झा यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे या कामाच्या दर्जाची शहरातील नागरिका समक्ष तांत्रीक तपासणी करावी, वापरत असलेल्या मटेरीयलची गुणवत्ता तपासावी, वाढीव कामाचा प्रस्ताव मंजूर करावा, सर्व लांबीत दुभाजक बसवावे. सर्व भागात नाली करावी. त्रयस्थ संस्थेच्या व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी एक नागरिक म्हणुन आमची मागणी असून यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा रस्त्याच्या खोदलेल्या खड्यांत बसून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Related posts