महाराष्ट्र मुंबई सोलापूर शहर

छावाचे योगेश पवार यांचे तक्रारीवरुन परमबीर सिंग आणि श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

सोलापूर -: राज्य शासन व मुंबई पोलिसांविरोधात कटकारस्थान करून, शासन व पोलिसांविषयी सातत्याने अप्रीतिची भावना चेतवणारे व कर्तव्यात कसूर करून टॉप सिक्रेट गोपनीयतेचा भंग करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि नागरी संरक्षणच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचेवर गुन्हा दाखल करण्याबाबतची लेखी तक्रार छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पोलीस महासंचालक, गृह सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली होती.
छावाचे योगेश पवार यांनी परमबीर सिंग आणि श्रीमती रश्मी शुक्ला यांचेविरुध्द गुन्हा दाखल करणेसाठी केलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आझाद मैदान पोलीसांनी, त्यांचेकडील जा. क्र. 2584/2021, दि. 08/04/2021 अन्वये विधी सल्लागार यांचा अभिप्राय व योग्य त्या कायदेशीर कारवाईचे आदेशाकरीता मा. वरीष्ठांना कार्यालयीन टिपणी सादर केली आहे. मा. वरीष्ठांकडुन अभिप्राय प्राप्त होताच आझाद मैदान पोलीसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी छावाचे योगेश पवार यांस दिले आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि नागरी संरक्षणच्या महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related posts