उमरगा उस्मानाबाद 

कोराळ येथे नेहरु युवा केंद्रातर्फे स्वच्छ्ता मोहीम संपन्न.

पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी

उमरगा – भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र अंतर्गत स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम साजरा. उमरगा तालुक्यातील कोराळ येथे नेहरु युवा केंद्र, उस्मानाबाद महाराष्ट्र भारत सरकार अंतर्गत स्वच्छ भारत अभियान प्लास्टिकमुक्त गाव कार्यक्रम राबविण्यात आले.


कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णु चंद्रकांत भगत, उपसरपंच विठ्ठल लाळे, ग्रामसेवक बिराजदार सर, इंजिनियर महेश भगत,महिला बचत गटाचे अध्यक्ष व उमेदचे सी. आर. पी. सौ मनिषा सोनवणे , महिला बचत गटाचे अध्यक्ष रागिणी माडजे , महिला बचत गटाचे सचिव कविता कांबळे व रुक्मिण कांबळे , महिला बचत गटाचे सदस्या उपस्थित होते तसेच युवा मंडळ , लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटेवाडी संस्थेचे अध्यक्ष पत्रकार श्री श्रावण परमेश्वर वाकळे , संत रोहिदास महाराज समाजमंदीर कोराळ येथे प्लास्टिकमुक्त करुन परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच गावामध्ये रॅली काढून प्लॅस्टिकमुक्त गाव करा आणि स्वच्छ गाव करा असे जनजागृती करण्यात आली .


यावेळी  विद्यार्थी व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक कुमारी वाकळे सुनिता श्रावण व विशाल श्रावण वाकळे , गावातील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts