पंढरपूर

खुपसुंगी येथे आवताडे यांच्या प्रचार सभांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

पंढरपूर(प्रतिनिधी)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार .समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ खुपसंगी ता.मंगळवेढा येथे गावभेट दरम्यान कॉर्नर सभा घेण्यात आली.

यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावणाऱ्या समाधान आवताडे यांच्यासाठी सर्वांनी आता पुढं यायला हवं. *कोणत्याही भावनिक अमिषाला बळी न पडता.विकासासाठी समाधान अवताडे अर्थात कमळ चिन्हाला निवडून आणण्यासाठी सहकार्य करा आणि मतदान करा असं आवाहन केलं.समाधान आवताडे हे सर्वांना सामावून घेणारे ,विकासाची नवी दृष्टी असणारे व्यक्तींमत्व आहे.केंद्रात पारदर्शक व स्वच्छ कारभार असणाऱ्या भा ज पा या राष्ट्रीय पक्षाची सत्ता आहे. तेव्हा मतदारसंघात हा उमेदवार आमदार म्हणून आला तर संपूर्ण तालुक्याचा विकास होणार आहे. असे उद्गार मान्यवर नेत्यांनी प्रचारसभेत काढले.

या प्रचारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख महाराष्ट्र राज्य माजी मंत्री, रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत,आमदार राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण,प्रा.येताळ भगत सर,प्रा.दत्तात्रय जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.,सूत्रसंचालन दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांनी केले.

Related posts