23.4 C
Solapur
September 10, 2024
पंढरपूर

तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी

तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी दिली माहिती.

पंढरपूर दि. 31 :
राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योनेतंर्गत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना लाभ दिला जातो.तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 3 हजार 145 तर श्रावणबाळ योजनेचे 1 हजार 953 असे एकूण 5 हजार 98 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.

निराधारांना आधार मिळावा यासाठी संजय गांधी व श्रावण योजना शासनाने सुरु केली आहे. संजय गांधी निराधार योजनेत 3 हजार 145 लाभार्थी लाभ घेत असून, त्यामध्ये सर्वसाधारण योजनेचे 2 हजार 724 , अनुसूचित जाती 229 व अनुसूचित जमातीचे 192 लाभार्थी लाभ घेत आहेत. तसेच श्रावणबाळ योजनेतील 1 हजार 953 लाभार्थ्यांपैकी सर्वसाधारण योजनेचे 1 हजार 574, अनुसूचित जाती 260 व अनुसूचित जमातीचे 119 लाभार्थी लाभ घेत आहेत. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती योजनेच्या लाभार्थ्यांचे माहे सप्टेंबर 2020 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार वाघमारे यांनी दिली.

तसेच श्रावणबाळ योजनेच्या सर्वसाधारण योजनेमधील 1 हजार 574 लाभार्थ्यांचे माहे ऑगस्ट 2020 पर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तर संजय गांधी निराधार योजनेच्या सर्वसाधारण योजनेमधील 2 हजार 724 लाभार्थ्यांचे माहे जुलै 2020 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजनेतील सर्वसाधारण योजनेतील माहे ऑगस्ट 2020 तर श्रावणबाळ योजनेमधील सर्वसाधारण योजनेतील माहे सप्टेंबर 2020 पासूनचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले.

Related posts