Blog

चीनला धडा शिकवायलाच हवा

सकाळी वर्तमानपत्र उघडलं तर नेहमी काही ना काही चीनच्या कुरापती दिसतात.कधी डोकलाममध्ये सैनिक तुकडी आणली आहे.तर कधी अरुणाचल आमचा भुभाग आहे.अरुणाचलचा भाग चीनच्या नकाशात दाखवला जातो.तर कधी भारतापेक्षा आम्ही काही कमी नाही हे दाखविण्यासाठी सीमारेषेवर सैन्य सरावही केला जातो.
नुकतंच आज वर्तमानपत्र हातात पडलं आणि एक चीनची करामत वर्तमानपत्रात दिसली.करामत होती की भारताचा अरुणाचल प्रदेश हा त्यांच्या सातबा-यात आहे.जसा भारताचा अरुणाचल प्रदेश त्यांच्या बापाचाच आहे.
मुख्यतः चीनच्या या कुरापती नेहमीच चालत असतात.कधी शत्रुत्व दाखवून तर कधी प्रेमानं ते भारताला नेस्तनाबूत करण्याच्या गोष्टी करीत असतात.कधी एखाद्या आजाराचा व्हायरस काढून आम्ही तुम्हाला आजाराच्या माध्यमातून खावून टाकू अशीही चीनची धमकी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात आम्हाला पाहायला मिळते.कधी ते अरुणाचल प्रदेशाला लक्ष करतात तर कधी लडाखला. कोरोनासारखा आजार हा देखील त्यांच्या कुरापतीचा एक प्रकारच.
आम्ही भारतवासी.आम्ही भारतात राहतो.त्यामुळं साहजिकच आम्हाला आमच्या भारताबद्दल अभिमान आहे.आम्ही आमच्या देशाला अबाधीत ठेवण्यासाठी प्राणाचं बलिदान देवू नव्हे तर ते देण्याची ताकद आमच्यात आहे.हे चीनला दिसत नाही की त्यांनी स्वतःचे डोळे बंद करुन ठेवले ते माहीत नाही.
आता तर चीनशी शत्रुत्व आहे.पण १९६२ चं चीनचं आक्रमण आम्ही विसरलो नाही.भारताचा मुळ स्वभाव हा सहिष्णू असल्याकारणानं या देशात येणारे परकीय नेहमीच या देशातील लोकांचा गैरफायदा घेतात.आर्य आले,ते स्थिरावले.पोर्तुगीज आले,ते स्थिरावले.मोगल आले,ते स्थिरावले.इंग्रज आले.तेही स्थिरावले.मग १९६२ ला चीनी सैनिक हिंदी चीनी भाई भाई म्हणत आले.ते व्यापार करु लागले.आम्ही आमचाच भाऊ म्हणून त्यांना व्यापार करण्याच्या सवलती दिल्या.मग काय व्यापार करता करता त्यांच्यात कुबूद्धी जागृत झाली व त्यांनी भारतावर आक्रमण केलं.त्यातच सीयाचीन रितसरपणे आपल्या देशाला जोडून घेतला.तरीही त्यांची भूक कमी झाली नाही.तर ती वाढतच आहे.
लाल बहादुर शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते.तेव्हा ताशकंद करार झाला.युद्ध संपलं.त्यापाठोपाठ त्यांची महत्वाकांक्षाही संपायला हवी होती.कारण सीयाचीन भारताचाच भाग.त्यांना ताश्कंद कराराच्या वेळी दिला.तरीही भारताचेच अजून भाग त्यांना हवे आहेत.आज अरुणाचल प्रदेश दिला.तरी त्यांची भूक काही कमी होणार नाही.त्यांना पूर्णतः भारत हवा आहे असे ते म्हणतील यात शंका नाही.कारण त्यांना वाटते भारत बांगड्या घालून बसलेला आहे.
भारत चीनपेक्षा कोणत्यात गोष्टीत मागं नाही.सैन्यदलाचा विचार केला तर त्यातही भारत पुढेच आहे.तंत्रज्ञानाचा विचार केला तर त्यातही भारत एक पाऊल पुढेच आहे.युद्ध साहित्याचा विचार केला तर त्यातही भारत मागे नाही.आता १९६२ चा भारत राहिला नाही की चीन भारताला हरवू शकेल.
चीनने आतातरी शांत बसावं.कारण १९६२ ला झालेलं आक्रमण हे गफलतीतून झालं होतं.तेव्हा भारत बेसावध होता.पण आता भारत बेसावध नाही.भारताजवळ सुसज्ज अशी विमानं तसंच सुसज्ज असं आरमार आज युद्धाचीच वाट पाहात आहेत.हे चीननं लक्षात ठेवावं.आज भारत चीनला १९६२ सारखा हिंदी चीनी भाई भाई समजत नाहीतर शत्रू समजतो.या आजच्या भारताच्या मनात व दृष्टाक्षेपात १९६२ ला गमावलेला सीयाचीनचा प्रदेश आहे.शिवाय इंग्रजांशी झुंज दिल्याचा अनुभव पाठीशी आहे.१९६२ चं चीनचं आक्रमण तसेच याच धर्तीवर लढलं गेलेलं चं पाकिस्तानचं आक्रमण या दोन्ही आक्रमणाचा अनुभव पाठीशी आहो.आमचा भारत कोणत्या दिवशी काय करेल हे सांगून दाखवत नाही.ते करुनच दाखवतं.हे चीननं लक्षात घ्यावं.जर का युद्ध झालंच.तर चीनला या पृथ्वीच्या पृष्ठभागावरच पाय ठेवायला जागा राहणार नाही.मग अरुणाचल प्रदेश सातबारा सोडा.गमावलेल्या सीयाचीनसह अख्खा चीन भारताच्या घशात येईल हे चीनने विसरु नये.
जे आतापर्यंत भारताकडून मिळालं.त्यावर चीननं समाधानी राहावं.असंतुष्ट भूमिका नाकारावी.कारण अरुणाचल प्रदेश हा भारताचा प्रदेश आहे.लडाख हा भारतीय प्रदेश आहे.डोकलाममध्ये भारतीय सैनिकांनी चीनच्या सैन्याची काय गत केली हे चीनला माहीतच आहे.तेव्हा फुकटच्या या कुरापती करण्यापेक्षा चीननं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेकडे व विकासाकडे लक्ष द्यावे.त्यातच त्यांचं भलं आहे.भारतावर युद्ध थोपवू नये.जर का त्यांनी भारतावर युद्ध थोपवलं तर त्याचे परीणामही गंभीर होतील हे चीननं विसरु नये.आम्ही शांतताप्रिय आहोत.आम्हाला शांतच राहू द्या.आम्हाला भडकवू नका.आम्ही जर भडकलो तर तुम्हीही या जगाच्या नकाशात दिसणार नाही हे लक्षात घ्या.मगच भारताचा अरुणाचलच नाही तर इतर भाग सातबा-यात दाखवा.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Related posts