Blog

मुल पाहिजे हो

अचानक आजचं वर्तमानपत्र हातात पडलं.त्यात एक बातमीही हातात पडली.मायबाप बारा दिवसाच्या नवजात शिशूला दवाखान्यात टाकून पसार झाले.बातमी जेव्हा वाचली,तेव्हा लक्षात आलं की त्यांनी जन्माला घातलेलं मुल कमजोर होतं,म्हणून ते सोडून गेले असावेत आपली जबाबदारी झटकून.मग विचार हा येतो की मुल त्यांचं.ते जन्माला आलं.मग त्यांची जबाबदारी कोण घेणार?लोकांनी घ्यावी का की ही जबाबदारी एक पालक म्हणून त्यांनीच घ्यायला हवी.मुलगा झाला ना.काहींना तर तसंही होत नसतं.
मुल पाहिजे हो अशी आर्त हाक काही लोकांची ऐकायला येत असते.काही जण तडफडत असतात मुलं व्हावी म्हणून.तरीपण त्यांना मुलं होत नाहीत.मग मुलं व्हावी म्हणून त्यांचे देवाला नवश कबूल करणे सुरु असते.अशातच एखाद्या वेळी ती घटना झालीच आणि मुल झालंच.तर त्या घटनेस देव पावला असं समजून मग हा नवश पूर्ण करण्यासाठी ज्या देवासाठी तो नवश केला जातो,तो नवश पूर्ण करतांना त्या देवाला कोंबड्या बक-याचा बळी देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतागायत सुरु आहे.मुलं काही देव देत नाही त.अन् मुल पैदा करण्यासाठी कोणताही देव कोणत्याच जिवजंतूंचा बळी मागत नाही.यात जे मुल जन्मास येतं,त्या मुलासाठी कोंबड्या बक-याचा नवश म्हणून बळी देत असताना ज्या कोंबड्या बक-याचा काहीही दोष नाही.मग ते बळी का म्हणून द्यायचे? याचा विचार कोणीही करीत नाहीत.काही लोकं नवश म्हणून कानोबा मांडू,फुलोरा ठेवू.गणपती मांडू असं नवश करीत असतात.तरीही काहींचे असे नवशं पूर्ण होत नाहीत.अर्थात मुलंच होत नाहीत.मग शेवटी हा भाग नशीबावर सोडून आपल्या नशीबातच नाही असं समजून लेकरु होण्याचं नावच सोडून देतात.ते मग नाईलाजानं प्रकृतीला स्विकारतात व दत्तक मुलं विकत घेवून बाळाचं स्वप्न पूर्ण करतात.काही तर टेस्ट ट्यूब बेबी ही करुन मुलं जन्माला घालत असतात.
निसर्गाच्या या चक्रात कोणाला जास्त मुलं होतात.तर कोणाला अजिबात होत नाही.काहींना लग्न न करता कुवारपणीही मुलं होतात.
ज्या मुलींना प्रेमप्रकरणातून कुवारपणी गर्भ राहतो.तो गर्भ राहिला हे माहित पडताच भीती आणि धाकानं सर्वात प्रथम त्या भ्रृणाची गर्भातच हत्या केली जाते.ती जर हत्या करता येणे शक्य असेल तर………पण जेव्हा अशी हत्या करता येणे शक्य होत नाही.तेव्हा मात्र अज्ञात स्थळी अतिशय गुप्तपणे मुलींना ठेवून नवजात शिशूला जन्मास घातले जाते.मग हे जन्मास घातलेले बाळ…….त्या बाळाला शाप समजून तसेच आपली बदनामी होईल असे समजून त्या अर्भकाला जन्म झाल्यानंतर मारुन टाकलं जाते आणि त्याची विल्हेवाट नाल्यात किंवा विहीरीत किंवा कच-याच्या ढिगा-यात लावली जाते.कारण हेच कच-यात फेकलेले हे अर्भक खात असतांना जेव्हा कुत्री दिसतात.त्या कुत्र्याच्या तोंडात अर्भकाचा एक पाय दिसतो.तर हात पाय व पूर्ण शरीर बाहेर असतं.त्या बाकीच्या शरीराच्या अवशेषावरुन ते माणसाचंच अर्भक आहे हे सिद्ध होते.काही जण तर ते अर्भक चक्क जीवंत असतांना विहिरीत टाकून देतात.दोन तीन दिवसानंतर त्या अर्भकाचं शरीर जेव्हा पाण्यावर तरंगतं,तेव्हा ते अर्भकच आहे हे सिद्ध होतं.नाल्यातही टाकलेले अर्भक जेव्हा पाण्याच्या कडेला लागतं,तेव्हा त्याही अर्भकाचे काही अवयव नाल्यातील जीवजंतूंनी खाल्लेले असतात.मग विचार येतो की ज्याला लोकं देव म्हणतात.तो देव अशांना मुलं का देतो? ज्याला मुल नको असतं.अन् ज्याला मुल हवं असतं.त्याला का नवश करावे लागतात.अन् नवश केले तरीही मुलं का होत नाहीत? हे सर्व प्रश्न न उलगडणारेच आहेत.
अलिकडे असे गुप्तपणे मायबापाला माहित न करता प्रेम करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत.त्यातच गर्भ राहिलाच तर त्याचा त्रास मुलींनाच होत असतो.तसेच मुले पळून जातात.तसेच मुलगी नको मुलगाच हवा याच अट्टाहासापायी गर्भलिंगनिदान करुन लपूनछपून भ्रृणाची तपासणी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असून ते भ्रृण मुलीचे निघाल्यास चक्क त्याला मारुन गर्भपात करुन घेण्याचे प्रकार जास्त वाढलेले आहेत.काही महाभाग अशा प्रेमप्रकरणातून झालेली मुलं अनाथालयाला दान देतात.तसेच अनाथालयातील संख्येत भर घालतात.मग असे गर्भातच भ्रृणाचे मरणे होत असतांना त्या परीवारात प्रकृतीनं मुलंच गर्भात ठेवायला नको.तर ती मुलं ज्यांना मुलं होत नाहीत.जे मुलांसाठी तडपतात,त्यांनाच द्यायला हवी.जेणेकरुन मुल पाहिजे हो म्हणायची वेळ येणार नाही.सर्वांच्या घरी सुख राहिल.आपलं मुल म्हणून त्यांनाही आनंद मिळेल.
महत्वाचं म्हणजे अशी जर तुमच्यावर मुलं त्यागण्याची वेळ येत असेल.तर तसे कृत्य करावेच कशाला? अर्थात विवाहापुर्वी प्रेम करावेच कशाला? मायबापांनाही तसा धोका द्यावाच कशाला? मुलं मारणं हे पापच नाही तर महापाप आहे.मग ते गर्भातलं का असेना. तुम्ही जर असे विवाहापुर्वी शरीरसंबंध ठेवून गर्भात राहिलेल्या अशा गर्भाची हत्या केलीच तर याच पापाचा विचार करुन निसर्ग पुढील काळात काळात विवाहानंतर तुम्हाला मुलं देणार नाही.मग तुमच्यावरही मुल पाहिजे हो असे म्हणण्याची वेळ येवू शकते.हे कोणीही विसरु नये.कारण तशी शक्यताही नाकारता येत नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Related posts