सोलापूर शहर

मनोहर सपाटें वर कारवाई करण्यासाठी छावाचे निषेध आंदोलन

सोलापूर -: माजी महापौर मनोहर सपाटे आणि लता जाधव यांचे विरोधात गुन्हा दाखल होवूनही 25 दिवस झाले तरीही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथा माजी महापौर मनोहर सपाटे आणि लता जाधव यांचेवर ए.सी.बी.पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीच ठोस अशी कायदेशीर कारवाई केलेली नाही. म्हणून आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी “सौ में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान”, अश्या घोषवाक्याचा शर्ट घालून योगेश पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निषेध नोंदविला.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की.., माजी महापौर मनोहर सपाटे आणि लता जाधव यांचेवर कोणतीच ठोस कायदेशीर कारवाई केली नाही. मनोहर सपाटे हा गुंड प्रवृत्तीचा व राजकीय नेता असल्याने त्यांचेकडून संबंधित एसीबी पोलिसांवर कारवाई न करणेबाबत दबाव येत आहे. मनोहर सपाटे याला पोलिसांनी मोकळे सोडल्यामुळे तो धर्मादाय आयुक्त व मनपा येथील पुरावे नष्ट करून बोगस कागदपत्रे तयार करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे योगेश पवार यांनी यावेळी सांगितले. मनोहर सपाटे विरोधात गंभीर कलमान्वये दखलपात्र गुन्हा दाखल होवूनही आरोपीस अटक न करता ए.सी.बी. पोलीस सीआरपीसी चे कलम 41(बी) प्रमाणे नोटीस पाठवून तपास करण्याच्या प्रयत्नांत आहेत. वास्तविक पाहता या गुन्ह्यात 41(बी) ची नोटीस पाठवून चौकशीच करता येत नाही. या सर्व गोष्टीचा निषेधार्थ योगेश पवार यांनी “सौ में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान”, या घोषवाक्याचा शर्ट घालून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा संशयास्पद भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

Related posts