अक्कलकोट

चपळगांव बँक ऑफ इंड़ीया शाखेकडून जागतिक महिला दिना निमित महिला बचत गटांना ७१ लाख रुपये वाटप.

अककलकोट ( प्रतिनिथी ) – जागतिक महिला दिनानिमित बँक ऑफ इंडिया चपळगांव शाखेच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी ५२ महिला बचत गटांना ७१ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड हया होत्या . याप्रसंगी अक्कलकोट बॅक ऑफ इंड़ीया कत्यँव्यदक्ष शाखाधिकारी शरणप्पा पुजारी गटविकास अधिकारी महादेव कोळी ,एम् एस् आर एल एमचे जिल्हाप्रमुख गंगा मडीवाळ ,तालुकाप्रमुख शैला केशवदास चपळगांव शाखा प्रबंधक श्याम कुलकर्णी , कृषी अधिकारी प्रशांत कांबळे उपस्थित होते .

वरील मान्यवरांच्या शुभहस्ते ५२ बचत गटांना ७१ लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले .सुनील राठोड अरुण बनसोडे , प्रतीक धनाळे, संतोष पाईकराव पोपट काटकर नीलम्मा म्हेत्रे अमोल पाटील त्रिबक गजधाने संतोष कुलकर्णी सुवर्णा पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले .

Related posts