तुळजापूर

आपसिंगा येथे केंद्र सरकार चा निषेध.

साईनाथ जगन्नाथ गवळी
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा,
प्रतिनिधी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांसाठी किसान सन्मान योजना आणली खरी पण 2019-20 मध्ये किसान सन्मान योजना अंतर्गत वाटप झालेले पैसे परत मागण्याचे पाप केंद्र सरकार ने केल्याच्या निषेधार्थ तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा गावात तहसीलदार यांनी दिलेल्या नोटीसा जाळण्यात आल्या. केंद्र सरकार च्या दुटप्पी भुमिकेचा निषेध केला.

यावेळी ग्रा. पं. सदस्य आमीर शेख, माजी सरपंच रामदास गोरे, ग्रा. पं. सदस्य सौदागर गोरे, अजित क्षीरसागर, माणिक तोडकरी, बालाजी पांचाळ, पिंटू राठोड, सुनिल जांभळे, बाळासाहेब बिडवे, भानुदास सरडे, जगन्नाथ हजारे, भैय्या सोनवणे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Related posts