उस्मानाबाद  तुळजापूर

शहापूर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा.

तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहापूर येथे सोशल मीडिया विभागप्रमुख विकास सुरवसे व युवासेना शाखाप्रमुख सचिन मोरे यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिवसेना सोशल मीडिया चे शहापूर विभागप्रमुख मा. विकास सुरवसे यांनी जयंतीचे औचित्य साधून स्व. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक शिवसैनिक बांधवांनी आपापली मते मांडून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शिवसेना सोशल मीडिया विभाग प्रमुख विकास सुरवसे, युवासेना शाखाप्रमुख सचिन मोरे, स्वामी कुंभार, लक्ष्मण व्हणताळे, प्रल्हाद जगताप, भाऊसाहेब सुरवसे, लकुळ शिंदे, लक्ष्मण लवटे आणि समस्त शहापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts