उस्मानाबाद  तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

महाराष्ट्र सरकारने संत सेवालाल महाराज यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजापूर येथील सागरी. तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

बंजारा समाजातील प्रत्येकाला जगण्याचा मार्ग सांगणारे, वणवण भटकणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गात मोडणाऱ्या बंजारा समाजाला काळाबरोबर जगण्याचा मार्ग सांगणारे ,थोर समाज सुधारक, क्रांतिकारक बहुजन एकतेचे पुरस्कर्ते, संत सेवालाल महाराज यांना आज श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी रमाकांत सर यांनी केले. विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक डॉ. विजय वडवराव यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकताना, बंजारा समाजातील संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुलाल डोडी या गावात झाला. संत सेवालाल महाराजांमुळे आज हे गाव ‘सेवागड’ या नावाने ओळखले जाते. समाजातील रूढी व परंपरांना छेद देऊन वणवण भटकणाऱ्या बंजारा समाजाला जो त्यांनी मार्ग दाखवला याची माहिती यावेळी त्यांनी दिली. याबरोबरच संत सेवालाल महाराजांच्या 22 वचनांचा अंगीकार करण्यांचे आवाहन डॉ. वडवराव सर यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पर्यवेक्षक, तसेच वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते.

Related posts