उस्मानाबाद  तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च विद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथील श्री. तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार, ज्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

23 फेब्रुवारी, 1876 मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगावात त्यांचा जन्म झाला आहे. धोबी कुटुंबात जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. धर्मशाळेजवळील एका झाडाखाली त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडकं, फाटलेली चादर हीच त्यांची संपत्ती होती. श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी रमाकांत सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते…

या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पर्यवेक्षक, तसेच वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts