करमाळा

रावगाव येथे राजीव गांधी वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव ता करमाळा येथे माजी राष्ट्रपती डाॅ अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला प्रथम डाॅ अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन युवा कार्यकर्ते भरत धगाटे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर डाॅ अब्दुल कलाम आझाद लिखीत अग्निपंख या पुस्तकाचे वाचन करण्यात आले लाॅकडाऊन नंतर शासननिर्णयाने ग्रंथालये चालू करण्यात आली यामुळे शासन नियमाचे पालन करण्यात आले यावेळी उपस्थितांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले यावेळी भरत धगाटे ,नानासाहेब शिंदे, तयाजी पवार, दादा पवार, राहूल पवार, प्रकाश कांबळे, तसेच बाल वाचक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सर्व उपस्थितीताचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.

Related posts