अक्कलकोट

वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा साजरी

कोरोनाच्या छायेत मंदीर बंद असल्याने भाविकांची अनुपस्थिती

प्रतिनिधी (अक्कलकोट) – 
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने साजरी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता देवीच्या गर्भदेवालयाचे विधीवत पुजा करुन द्वार उघडण्यात आले. यानंतर पुरोहित मंदार पुजारी व ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते विधिवत लघुरुद्र करुन देवीस महानैवेद्य व कोजागरी पौर्णिमेस विशेष मान असणारे मसाला दुध प्रसाद दाखविण्यात आले, यानंतर मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते उपस्थितांना दुध प्रसाद वाटप करण्यात आले. मोजक्या संख्येत उपस्थित असलेल्या देवी भक्तांनी याप्रसंगी या दुध प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता यावेळी उपस्थितांनी सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले.


वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीच्या गर्भ देवालयाचे द्वार उघडल्यानंतर लघुरूद्र करून आरती करताना महेश इंगळे, मंदार पुजारी व अन्य दिसत आहेत.

Related posts