उस्मानाबाद  तुळजापूर

विविध सामाजिक उपक्रमाने शिवजयंती साजरी

तुळजापूर तालुका प्रतिनिधी / पुरूषोत्तम विष्णु बेले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावामध्ये शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला, पाच दिवसीय होऊ घातलेल्या कार्यक्रमात अखेर च्या दिवशी चिकुंद्रा पॅटर्न या सामाजिक ग्रुप तर्फे लहान मुलांच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या,

या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या त्यामध्ये ८ ते १० प्रथम गटातून प्रथम क्रमांक संयोगिता भागवत जोगी द्वितीय क्रमांक उमा शाहूराज गायकवाड, तृतीय क्रमांक अपेक्षा सतिश गायकवाड गट क्र.२ छोटा गट ५ ते ७ असा होता या गटातून प्रथम क्रमांक श्रुती कोठावळे द्वितीय क्रमांक सुजाता नामदेव चव्हाण तृतीय क्रमांक साक्षी सोमनाथ कानडे यांचे आले. सदरील स्पर्धेचे परीक्षण म्हणून केशर जाधवर, सौदागर (बाळू )सर्जे यांनी काम पाहिले.

पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमासाठी सौदागर गायकवाड, निरंजन गरड, पुरूषोत्तम बेले, सौदागर गरड, रामकृष्ण गरड, विजय गरड, उमेश गरड, सागर मोटे, नितीन मोटे, प्रमोद गायकवाड आदींसह गावातील ग्रामस्थ व तरूणांनी परिश्रम घेतले.

Related posts