महाराष्ट्र

लोकमंगल एबीएम महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व सर्व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा निश्चय केला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. रणजीत पाटील,सर्व शिक्षक तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले.

Related posts