उस्मानाबाद  तुळजापूर

तालुक्यात झंझावात भगवे वादळ निर्माण करून मा. पक्षप्रमुख व खासदार यांना देणार वाढदिवसाची भेट – तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी.

तुळजापूर – येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात झंझावात भगवे वादळ निर्माण करून मा. पक्षप्रमुख व खासदार यांना देणार वाढदिवसाची भेट असे प्रतिपादन तुळजापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी केले आहे. तुळजापूर तालुका पदाधिकारी आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते.

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, नवनिर्वाचित संपर्कप्रमुख सुनील काटमोरे तसेच सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, खा. ओमराजे निंबाळकर तथा जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक दौरा सध्या सुरु आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष बांधणीवरती विशेष लक्ष देऊन, नवनिर्वाचित संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तसेच जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिकांना पेटून उठवत तालुक्यात भगवी झंझावात निर्माण करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील सर्व स्थानिक शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या सर्व समस्यांचा, कार्याचा आढावा घेत, तालुक्यात झंझावात भगवे वादळ निर्माण करून मा. पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच धाराशिव लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना वाढदिवसाची एक आगळी-वेगळी भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना सांगितले.

पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, स्व. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकदिलाने काम करू, जनतेसाठी लढू आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भगवे वादळ निर्माण करू असे आवाहन त्यांनी संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक बांधवांना यावेळी केले.

Related posts